नांदेडलाइफस्टाइल

Sanjay Budkewar ; दैनिक प्रजावानीचे उपसंपादक संजय बुडकेवार यांचे निधन – NNL

नांदेड। दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक संजय बुडकेवार यांचे आज पहाटे ३ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुजरातमधील कुबेर येथे दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ४८ वर्षांचे होते.

अत्यंत संयमी, मितभाषी आणि सर्वसमावेशक पत्रकार म्हणून गेल्या २० वर्षांपासून संजय बुडकेवार माध्यम क्षेत्रात कार्यरत होते. दैनिक प्रजावाणीमध्ये उपसंपादक पदावर गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करीत होते. दोन-तीन दिवसांपूर्वी पत्नी व मुलीसोबत देवदर्शन आणि पर्यटनासाठी ते गुजरातमध्ये गेले होते. आज दि. ३० डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता गुजरातमधील कुबेर येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचा पार्थिव देह गुजरातमधून नांदेड येथे रात्री उशिरा आणण्यात आला असून, दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता गोवर्धनघाट स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिवंगत पत्रकार संजय बुडकेवार यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने वृत्तपत्र सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button