नांदेड| इतवारा हाद्दीतील पैशाचे व्यवहारातून झालेले अपहरण प्रकरणातील सात आरोपीतांना 12 तासाचे आत अटक करण्यात आली असून, त्यांचे कडुन तिन खंजीर व एक टाटा सफारी जिप असा एकुण 10,03,000/- रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आली आहे. हि धडाकेबाज कार्यवाही स्थानीक गुन्हे शाखेने केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नांदेड शहरात पो.स्टे. इतवारा हाद्दीत बाफना टिपॉईट येथुन फिर्यादी नामे गौरव कोटगीरे यांना काही इसमांनी अपहरन केल्याची माहीती मिळाले वरुन मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवुन अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नांदेड व त्यांचे दोन टिम तसेच शहरातील पो.स्टे.चे डि.बि. पथक यांना आरोपीतांचा शोध घेणे कामी व नांदेड जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावुन आरोपीतांचा शोध घेणे कामी आदेशीत केले होते.
त्यावरून दिनांक 14/12/2024 रोजी उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नांदेड, आनंद बिचेवार, पोउपनि स्थागुशा नांदेड व मिलींद सोनकांबळे पोउपनि स्थागुशा नांदेड हे त्यांचे टिम मधील अमलदार यांचे सोबत नांदेड शहरात आरोपीतांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदार मार्फत यातील फिर्यादीस अपहरण करणारे आरोपी बालाजी शिवाजी जाधव वय 29 वर्षे व्यवसाय व्यापार रा. दयासागर नगर तरोड खु. नांदेड, दिलीपसिंग हरीसींग पवार वय 32 वर्षे व्यवसाय मजुरी रा. विस्तारीत नाथनगर नांदेड, अनिल शिवाजी भगत वय 35 वर्षे व्यवसाय मजुरी रा. दरवेश नगर हिंगोली नाका नांदेड, बालाजी किशन भारती वय 36 वर्षे व्यवसाय मजुरी रा. श्रीरामनगर हिंगोली नाका नांदेड, सुनील ग्यानोबा वाघमारे वय 34 वर्षे व्यवसाय मजुरी रा. नाईक नगर नांदेड, अमनदिप अवतारसिंग राठोड वय 24 वर्षे व्यवसाय बेकार रा. मगनपुरा हनुमान मंदीर जवळ नांदेड, चैतन्य संजय जोंधळे वय 19 वर्षे व्यवसाय बेकार रा. विष्णुपुरी नांदेड व एक विधीसंघर्षग्रस्त बालक हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन यांचे वर गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली व सदरचे आरोपी हे मारतळा भागात असल्याची खात्रीशीर माहीती मिळाले वरुन त्यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांना अपहरण करण्याचे कारण विचारले असता आरोपी नामे बालाजी शिवाजी जाधव यांचे व फिर्यादी गौरव कोटगीरे हा जुन वाहणे खरेदी विक्री करणे व फायनान्सचा व्यवहार करणे या वादावरुन सदर अपहरण केल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत आहे. ताब्यातील आरोपीतांची गुन्हे पार्श्वभुमी चेक केली असता आरोपी नामे दिलीपसिंग हरीसिंग पवार याचे वर विविध पो.स्टे.ला एकुण 15 गुन्हे, आरोपी नामे बालाजी शिवाजी जाधव याचे वर 03 गुन्हे, अनिल शिवाजी भगत याचे वर 05, बालाजी किशन भारत याचे वर 03 गुन्हे, सुनिल ग्यानोबा वाघमारे यांचे वर 01 गुन्हा दाखल असल्याचे अभिलेखावरुन माहीती मिळाली आहे. वरील आरोपीतांकडुनं गुन्हयात वापरलेले तिन खंजीर व एक टाटा सफारी जिप असा एकुण 10,03,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी विरुध्द पो.स्टे. इतवारा येथे गुन्हा दाखल असल्याने त्यांना पुढील तपास कामी पो.स्टे. इतवारा येथे हजर केले आहे. सदर कार्यावाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, रणजित भोईटे, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. इतवारा, आनंद बिचेवार पोउपनि, स्था.गु.शा. नांदेड, मिलींद सोनकांबळे पोउपनि, स्था.गु.शा. नांदेड, रमेश गायकवाड, पोउपनि, पो.स्टे. इतवारा, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, प्रभाकर मलदोडे, रवी बामणे, संजीव जिकंलवाड, चंद्रकांत स्वामी, विश्वनाथ पवार, राहुल लाठकर, मोतीराम पवार, तानाजी येळगे, तिरुपती तेलंग, बालाजी तेलंग, राजकुमार डोंगरे, चालक हैंमत बिचकेवार, सिध्दार्थ सोनसळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी केली आहे. या कार्यवाहीत सहभागी असलेले पोलीस अधिकारी व अमलदार यांना मा. पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड यांनी बक्षीस जाहीर करुन सर्व सहभागी पोलीस अधिकारी व अमलदार यांचे कौतुक केले आहे.