उस्माननगर। येथे लोकनेते कै. माधवराव पाटील पांडागळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त खुल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी क्रिकेट स्पर्धेचे प्रा. विजय भिसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी गजानन काळम, सामन्याचे आयोजक तथा पत्रकार अध्यक्ष अमजद खान पठाण, माजी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड, कंधार लोहा विधानसभा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य कमलाकर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अंगुलीकुमार सानसळे, ग्रा.प. सदस्य प्रतिनिधी दिगंबर भिसे, सामाजिक कार्यकर्ते सिकंदर भाई,अंकुश काळम, सुनील जमदाडे, शिवाजी पुनवड, स्वप्नील कांबळे, ऍड. नागण भिसे, गौस पठाण, सोमनाथ काळम, पठाण सर, पत्रकार लक्ष्मण कांबळे यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, क्रीडा प्रेमी , तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर बोलताना प्रा. विजय भिसे यांनी आयोजित क्रिकेटच्या स्पर्धा ठेवण्यामागची टूर्नामेंट आयोजना मागची भूमिका सांगितली. ग्रामीण भागातील खेळाडूना प्रोत्साहन मिळावे यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूनी राष्ट्रीय खेळा पर्येत जाण्यासाठी मेहनत करावी .
आपल्या गावाचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेमधील पहिला सामना राजमुद्रा क्रिकेट क्लब आलेगाव आणि दीप तांडव क्रिकेट क्लब दहीकळंबा यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यासाठी सद्दोदिन तांबोळी, असद खा पठाण यांनी पंच म्हणून काम पाहिले. तर गुणलेखक म्हणून अदमनकर यांनी आपले योगदान दिले. या सामन्यासाठी भरमसाठ बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. त्याच बरोबर उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून बक्षीसे ठेवण्यात आले आहेत. या सामन्यासाठी जिल्ह्यातून संघांनी सहभाग घेतला आहे.