Tennis ball Cricket ; उस्माननगर येथे खुल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्यास प्रारंभ -NNL
उस्माननगर। येथे लोकनेते कै. माधवराव पाटील पांडागळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त खुल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी क्रिकेट स्पर्धेचे प्रा. विजय भिसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी गजानन काळम, सामन्याचे आयोजक तथा पत्रकार अध्यक्ष अमजद खान पठाण, माजी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड, कंधार लोहा विधानसभा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य कमलाकर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अंगुलीकुमार सानसळे, ग्रा.प. सदस्य प्रतिनिधी दिगंबर भिसे, सामाजिक कार्यकर्ते सिकंदर भाई,अंकुश काळम, सुनील जमदाडे, शिवाजी पुनवड, स्वप्नील कांबळे, ऍड. नागण भिसे, गौस पठाण, सोमनाथ काळम, पठाण सर, पत्रकार लक्ष्मण कांबळे यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, क्रीडा प्रेमी , तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी भारताचे मा...
