Thursday, May 14

Tag: Deputy Editor of Dainik Prajavani Sanjay Budkewar passes away

Sanjay Budkewar ; दैनिक प्रजावानीचे उपसंपादक संजय बुडकेवार यांचे निधन – NNL

Sanjay Budkewar ; दैनिक प्रजावानीचे उपसंपादक संजय बुडकेवार यांचे निधन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक संजय बुडकेवार यांचे आज पहाटे ३ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुजरातमधील कुबेर येथे दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ४८ वर्षांचे होते. अत्यंत संयमी, मितभाषी आणि सर्वसमावेशक पत्रकार म्हणून गेल्या २० वर्षांपासून संजय बुडकेवार माध्यम क्षेत्रात कार्यरत होते. दैनिक प्रजावाणीमध्ये उपसंपादक पदावर गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करीत होते. दोन-तीन दिवसांपूर्वी पत्नी व मुलीसोबत देवदर्शन आणि पर्यटनासाठी ते गुजरातमध्ये गेले होते. आज दि. ३० डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता गुजरातमधील कुबेर येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा पार्थिव देह गुजरातमधून नांदेड येथे रात्री उशिरा आणण्यात आला असून, दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता गोवर्धनघाट स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिवंगत पत्रकार...
error: Content is protected !!