नवीन नांदेड| सायन्स कॉलेज नांदेड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय 600 मीटर धावणे क्रिडा स्पर्धेमध्ये मध्ये प्रथम क्रमांक व 200 मीटर धावणे मध्ये विद्यार्थी सोहम दिगांबर चक्रधर याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.


जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी, संचलित शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड या शाळेचा विद्यार्थी सोहम दिगांबर चक्रधर याने सायन्स कॉलेज नांदेड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय 600 मीटर धावणे क्रिडा स्पर्धेमध्ये मध्ये प्रथम क्रमांक व 200 मीटर धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळविला.


या विद्यार्थ्यास विद्यालयाचे क्रीडाशिक्षक एस. एम.मुदिराज यांनी मार्गदर्शन केले. दरवर्षीप्रमाणे सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांत विद्यालयाने चांगले यश मिळविल्याने संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव संस्थेचे उपाध्यक्ष रवी शिवाजीराव जाधव,प्राचार्य साहेबराव देवरे, पर्यवेक्षक व्ही.एस पाटील,वरिष्ठ लिपीक वसंत वाघमारे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन केले.




