धार्मिक

सरकारने देवस्थानच्या वर्ग २ च्या इनामी जमिनी वर्ग १ मध्ये करून कायमस्वरूपी कब्जेदारांच्या मालकी हक्कात देण्याच्या निर्णयाला मंदिर महासंघाचा तीव्र विरोध ! -NNL

मुंबई। मंदिराचे आर्थिक व्यवस्थापनदिवाबत्ती आणि वार्षिक उत्सव आदी सर्व व्यवस्थित पार पडावे या उदात्त हेतुने राजेमहाराजे यांसह भाविकांनी स्वत:ची जमीन मंदिरांना दान दिलीया ‘वर्ग २’ मध्ये असलेल्या जमीनी कोणालाही विकता येत नाहीअसे असतांना मराठवाड्यातील या ‘वर्ग २’ च्या इनामी जमीनी ‘वर्ग १’ मध्ये रूपांतरित करून भोगवाटदार अथवा कब्जेदार यांच्या ताब्यात कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेणार असल्याचे शासनाने प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहेसरकारचा हा प्रस्तावित निर्णय मंदिरांना कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या दुर्बल करणारा असल्याने ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा या निर्णयाला तीव्र विरोध आहेसरकारने या निर्णयाचा फेरविचार करून असा कोणताही निर्णय सरकारने घेऊ नयेअसे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्रीसुनील घनवट यांनी दिला आहेया संदर्भात कालच मंदिर महासंघाच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली आणि त्यात वरील निर्णय घेण्यात आला.

एक कोटी रुपयांची बाजारमूल्य असलेल्या जमीनीची केवळ ५ लाख रुपये भोगवाटदार वा कब्जेदाराने जमा करायचीत्यातील केवळ २ लाख रुपये रक्कम एकदाच मंदिराला मिळणारहे अत्यंत अन्यायकारक आहेसर्वोच्च न्यायालयाने ‘मंदिरांची भूमी पुजारी अथवा भोगवाटदार यांच्या नावाने करता येत नाही’तसेच ‘मंदिरांच्या जमीनीवर अन्य कोणाचा अधिकार नाही’असे ऐतिहासिक निर्णय दिलेले आहेत. ‘मंदिराची संपत्ती पूर्णपणे संरक्षित ठेवणे हे सरकारचे दायित्व असल्याचा’ महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २००७ मध्ये दिला आहेत्यामुळे शासनाचा सदर निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लंघन करणारा ठरेल

देशात सर्वांना न्याय समान असतांना आजही देशातील केवळ मंदिरांचेच सरकारीकरण केले जातेमंदिरांचाच पैसा सरकार स्वतःकडे घेतेमंदिरांच्याच पैशावर कर लावला जातोमात्र धर्मनिरपेक्ष सरकार हा न्याय चर्च व मशिदींना का लावत नाही जर सरकारला जर जमिनी हव्या असतील तर भारत सरकार नंतर सर्वाधिक जमिनीची मालक असलेल्या वक्फ बोर्डाची लाखो एकर जमीन वर्ग १ मध्ये हस्तांतरित करून ती अतिक्रमणे हटवण्याचे काम सरकारचे आहेअसे न करत त्या जमीनी भोगवाटदार वा कब्जेदारांच्या कायमस्वरूपी मालकी हक्कात देणे अयोग्य आहेया निर्णयामुळे मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापनमंदिराची डागडुजीरंगकामवार्षिक उत्सव आदि सर्वांवर गदा येणार आहेमंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडणार आहेहे कोणतेही मंदिर व्यवस्थापन आणि भाविक जनता स्वीकारू शकत नाही

एकीकडे देशातील अनेक भाजप सरकार तेथील मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करण्याचा विचार करत आहेमंदिरांना आर्थिक साहाय्यता करत आहेतअसे असताना महाराष्ट्रात मात्र मंदिरांच्या जमिनीबाबत अशी भूमिका का हा प्रश्न समस्त मंदिर विश्वस्तांना पडला आहेसमस्त मंदिर विश्वस्तपुजारी आणि मंदिर प्रतिनिधी यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने सदर निर्णय घेऊ नये अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.

श्री. सुनील घनवट, राज्य समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ. (संपर्क क्रमांक : ७०२०३८३२६४)

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!