HomeनांदेडSatyanarayan Maharaj Khude passed away | सोनपेठ मठाचे मठाधिपती सत्यनारायण महाराज खुडे...

Satyanarayan Maharaj Khude passed away | सोनपेठ मठाचे मठाधिपती सत्यनारायण महाराज खुडे यांचे अल्पशा आजाराने निधन – NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| सोनपेठ जलधरा मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री सत्यनारायण महाराज गणपत खुडे यांचे आज दिनांक 3 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. परम पूज्य सत्यनारायण महाराज यांचे किनवट माहूर तालुक्यामध्ये हजारो भक्त गण होते.

ते जलधरा येथील डॉक्टर चांगदेव खुडे यांचे वडील असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सौ. रंगुबाई चांगदेव खुडे यांचे ते सासरे आहेत. त्यांच्या पश्चात शिक्षण क्षेत्रात व वैद्यकीय क्षेत्रात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत काम करणारी कर्मचारी असलेले त्यांना चार नात जावई चार नाती दोन नातू व दोन सुना असा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहेत.

IMG 20240803 114944 Satyanarayan Maharaj Khude passed away | सोनपेठ मठाचे मठाधिपती सत्यनारायण महाराज खुडे यांचे अल्पशा आजाराने निधन - NNL

परम पूज्य सत्यनारायण महाराज यांचा अंत्यविधी आज सायंकाळी चार वाजता जलधरा येथील महादेव मंदिराच्या परिसरामध्ये होणार असून पंचक्रोशीतील हजारो भक्तगण या अंत्यविधीस मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार आहेत. परमपूज्य महाराजांच्या देवाज्ञांनी परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments