नांदेडराजकीय

Daawat-e-Iftar : रमजान ईद निमित्त हिमायतनगरमध्ये भव्य दावत-ए-इफ्तार पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा वतीने केले होते आयोजन

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| पवित्र रमजान ईद (ईद-उल-फित्र) सणाच्या पार्श्वभूमीवर हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने शहरातील चौपाटी परिसरातील दारुल उलूम येथे भव्य दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात सौहार्दपूर्ण वातावरणात सर्वांनी एकत्र येत इफ्तारचा आनंद लुटला.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला रमजान ईदचा सण आनंदात साजरा व्हावा तसेच समाजात भाईचारा अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या इफ्तार पार्टीला हिमायतनगर शहरातील हिंदू, मुस्लिम तसेच विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. यावेळी विजय वळसे यांनी आमदारांच्या वतीने उपस्थित सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

अजान होताच सायंकाळी ६.३७ वाजता इफ्तार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष रफिक सेठ, गटनेते तथा नगरसेवक डॉ.राजेंद्र वानखेडे, नगरसेवक भारत डाके, नगरसेवक जिशान मिरझा, नगरसेवक सुभाष बलपेलवाड, नगरसेवक सरदार खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाप्रमुख वामनराव मिराशे, माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद भाई, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, विकास पाटील देवसरकर, शहराध्यक्ष गजानन हरडफकर, ज्ञानेश्वर पुट्ठेवार, राम नरवाडे, प्रभाकर क्षीरसागर, रमेश पळशीकर, बाळू अण्णा चवरे, राजू अप्पा बंडेवार, सतीश सेठ, जुनेद भाई, रिजवान सेठ,

माजी जी.प.सदस्य समद खान, अन्वर खान, जफर लाला, अश्रफ भाई, फेरोज कुरेशी, खालिद भाई, संतोष मुद्देवाड, डॉ.आनंद माने, डॉ.गणेश कदम, डॉ.वानखेडे, कैलास राठोड, मुख्तार भाई, मुजीब खान पठाण, अब्दुल बाकी सेठ, दत्तात्रेय तीम्मापुरे, जावेद कुरेशी, श्याम जक्कलवाड, राजू चाटलेवाड, गणेश कदम डोल्हारीकर, दत्ता देवकते, श्याम पाटील खैरगावकर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, कार्यकर्ते व पत्रकारांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद मनानभाई यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवसैनिकांनी मानले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button