Friday, May 15

Guardian Minister Atul Save : प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार नांदेडचा ध्वजवंदन

नांदेड| भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2025 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे (Guardian Minister Atul Save) यांच्याहस्ते ध्वजवंदन होणार आहे.

सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये,असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था,आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे दोन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार 25 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने दुपारी 1.30 वा. नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. रविवार 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून पोलीस कवायत मैदान नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 ते 10.25 वाजेपर्यंत भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन, संचलन समारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजिराबाद नांदेड.

सकाळी 10.30 ते 10.50 वाजेपर्यंत आमदार श्रीजया चव्हाण भोकर विधानसभा क्षेत्र यांच्या “युवा उमेद” नामक फेसबुकपेजच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- यशवंत कॉलेज नांदेड. सकाळी 11 वा. श्री आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- एफ.एम.होंडा शोरुम समोर मामा मराठा हॉटेलच्यापाठिमागे हिंगोलीगेट रोड नांदेड. सकाळी 11.15 वा. श्री आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथून शासकीय वाहनाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!