Guardian Minister Atul Save : प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार नांदेडचा ध्वजवंदन
नांदेड| भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2025 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे (Guardian Minister Atul Save) यांच्याहस्ते ध्वजवंदन होणार आहे.
सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये,असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था,आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले...
