नांदेड| नांदेड पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिनांचे अनुषंगाने एकुण स्थानिक 35 व वरिष्ठ 375 असे एकुण 410 अर्ज निकाली (410 applications were disposed) काढण्यात आले आहेत. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दर शनिवारी नागरिकांच्या तक्रार निवारणाच्या अनुषंगाने मोहिम राबविणे बाबत आदेश दिले होते.

नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये प्रलंबित प्रकार अर्जाची संख्या वाढली होती सदर तक्रारीचा वेळेत अर्ज निकाली काढणे बंधनकारक असल्याने अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना सदर तक्रारी अर्ज तात्काळ निकाली काढण्यासाठी सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने काल दिनांक 18.01.2025 रोजी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारणाची मोहिम राबविण्यात आली त्यामध्ये जिल्हयात एकुण स्थानिक 35 व वरिष्ठ 375 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. तसेच यापुढे दर शनिवारी नांदेड पोलीसांकडुन तक्रार निवारणाची मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमे मध्ये पोलीस विभागाशी व इतर विभागाशी पोलीस स्टेशन येथे दिलेले अर्ज त्या विभागाचे संबधीत अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयाने सदरचे अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत.

तरी नांदेड जिल्हयातील सर्व नागरीकांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबधीत पोलीस स्टेशन येथे जावुन त्यांनी दिलेल्या तक्रारीचे निवारण करून घेण्यात यावे, असे मा. पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी आवाहन केले आहे. सदरची कामगिरी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड, तसेच शहरातील सर्व पोस्टे चे प्रभारी अधिकारी यांनी केली आहे सदर कामगिरी बाबत मा. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.
