नांदेड। शहरातील सिटू भवन येथे रविवारी २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमित्रांचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राज्यातील सर्व जिल्हयाचे आरोग्य मित्रांनी सहभाग नोंदवला.

संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी महाराष्ट्रातील आरोग्य मित्रांना मार्गदर्शन केले. यामध्ये राज्यातील विविध जिल्हयातील आरोग्यमित्रांची पदाधिकारी म्हणुन नेमणुक करून आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची महाराष्ट्राची कमिटीची स्थापना केली. अधिवेशनामध्ये समस्या कॉ डॉ. डी. एल. कराड यांनी जाणून घेतल्या. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील सहाय्य संस्था (TPA कंपन्या) ह्या आरोग्यमित्रांचे आर्थिक शोषण करीत आहेत, असे आरोग्यमित्रांनी निदर्शनात आणून दिले. लवकरात लवकर राज्य आरोग्य हमी सोसायटी, आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री यांना पगारवाढीचे निवेदन देण्याची

मागणी आरोग्य मित्रांकडून करणयत आली. तसेच सर्व आरोग्य मित्रांना मिान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, आरोग्य मित्रांना हक्काच्या रजा मिळाव्यात, आरोग्य मित्रांची नोकरीची हमी राज्य आरोग्य हमी सोसायटीने घ्यावी अशी मागणी सर्व आरोग्यमित्रांच्या वतीने करण्यात आली. यावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. कराड म्हणाले की आपल्या मागण्या आपण सरकारपर्यंत पाहोचविणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपण आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याना निवेदनाचे पत्र देऊ. जर

आरोग्यमित्रांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास आपण राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहोत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली. आरोग्य मित्रांना किमान वेतन कायानुसार पगार न दिल्यास राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय आपण सर्व घेऊ. राज्य आरोग्य हमी सोसायटीने नेमलेल्या सहाय्य संस्थेने (TPA कंपनी) आरोग्यमित्रांना अकुशल कामगार म्हणून दाखविले असल्याची माहिती आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व उपाध्यक्ष गणेश शेंडे यांनी दिली.
