नांदेड| नांदेड शहर व ईतवारा उपविभागातील पोलीसांनि कोम्बींग ऑपरेशन (Police combing operation) राबवून 42 जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, 05 जेल रीलीज आरोपीची तपासणी करत कोम्बींग ऑपरेशन यशस्वी केले आहे. यासाठी एकूण 99 अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम पहिले आहे.

अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी शहरातील सक्रिय गुन्हेगारांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने व अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी नांदेड शहरातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व प्रभारी अधिकारी यांना नांदेड शहरात दिनांक 18.01.2025 रोजी चे वेळ 23.00 ते दिनांक- 19.01.2025 चे वेळ 02.00 वाजेपावेतो कोम्बींग ऑपरेशन राबवून शहरात मालाविरुद्धचे गुन्हे करणारे आरोपी व जेल रीलीज आरोपी चेक करण्याचे आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने नांदेड शहरात खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सदर कोम्बींग ऑपरेशन हे अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली किरितिका सी.एम. सहायक पोलीस अधिक्षक नांदेड व सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग ईतवारा तसेच नांदेड शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व अंमलदार यांनी नांदेड शहरातील पो.स्टे. वजिराबाद, पो.स्टे. शिवाजीनगर, पो.स्टे. भाग्यनगर, पो.स्टे. विमानतळ, पो.स्टे. नांदेड ग्रामीण, पो.स्टे. ईतवारा हद्दीत कोम्बींग ऑपरेशन राबवून वरीलप्रमाणे कारवाई केली आहे.
