Health Workers ; आरोग्यमित्रांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळाला पाहिजे – कॉ डॉ. डी. एल. कराड.
नांदेड। शहरातील सिटू भवन येथे रविवारी २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमित्रांचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राज्यातील सर्व जिल्हयाचे आरोग्य मित्रांनी सहभाग नोंदवला.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी महाराष्ट्रातील आरोग्य मित्रांना मार्गदर्शन केले. यामध्ये राज्यातील विविध जिल्हयातील आरोग्यमित्रांची पदाधिकारी म्हणुन नेमणुक करून आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची महाराष्ट्राची कमिटीची स्थापना केली. अधिवेशनामध्ये समस्या कॉ डॉ. डी. एल. कराड यांनी जाणून घेतल्या. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील सहाय्य संस्था (TPA कंपन्या) ह्या आरोग्यमित्रांचे आर्थिक शोषण करीत आहेत, असे आरोग्यमित्रांनी निदर्शनात आणून दिले. लवकरात लवकर राज्य आरोग्य हमी सोसायटी, आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री यांना पगारवाढीचे निवेदन देण्या...
