नविन नांदेड। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशा नुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजय भाऊ मोरे व ओबीसी नेते तथा शिवसेनेचे व्हिजेएनटी ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शना खाली व यांच्या हस्ते दि ३० स्पटेंबर रोजी बाळासाहेब शिवसेना भवन मुंबई येथे अनिल कुमार धमने पाटील यांची ओबीसी व्हिजे एनटी विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येऊन नियुक्ती पत्र देण्यात आले, या निवडीबद्दल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.


गेल्या २६ वर्षा पासून अनिल कुमार धमने पाटील हे शिवसेना . भाजपा ,महात्मा फुले समता परिषद राष्ट्रवादी ओबीसी सेल ओबीसी संघर्ष समीती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदासह विविध पदांसह राजकीय सामाजिक यासह विविध पदावर त्यांनी काम केले असून सर्व क्षेत्रात आजवर केलेल्या उल्लेखनिय कार्य केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना शिवसेना व्हिजे एनटी ओबीसी विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.


हे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे ,शिवसेना मूख्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले असून या नियुक्ती पत्रावर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार प्रसार कराल व तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्व घटकांना सोबत घेऊन संघटन वाढवून कार्य कराल असा विश्वास व्यक्त करूण आपणास पुढील कार्यास शुभेच्छा देते असा उल्लेख नियुक्ती पत्रात केलेला आहे.

या निवडी बद्दल नारायण अंबुरे,संजय सोनकांबळे हर्षराज सोनवणे, विनोद वंजारे, गणेश जिंदम ,पिंटू पदरे ,राम खरात ,नारायण खरात,श्याम नायगावे देवराव पांचाळ ,नवनाथ विभूते ,विजू पांचाळ ,सुभाष माचनवाड ,संतोष शिंदे,राजू कऱ्हाळे,यांच्या सह अनेक मित्रमंडळी यांनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
