मुक्रमाबाद, बस्वराज वंटगिरे| मुखेड तालुक्यातील इटग्याळ पमु येथील महिला सुनिता ज्ञानोबा बनबरे ३५ यांचे दि.१८रोजी पहाटे माहेर लखमापूर शिवारातील नामदेव मोतेकर (A woman who went missing four days ago was found) यांच्या विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे आढळून आले.रामराव जाधव रा. लखमापूर यांनी दिलेल्या खबरीवरून मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मध्ये शनिवारी रात्री आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इटग्याळ पमु. येथील मयत महिला सुनिता ज्ञानोबा बनबरे या दि.१५ तारखेपासून बेपत्ता झाल्यामुळे नातेवाईकांनी खूप शोधा शोध केल्या पण त्या दिसून आल्या नव्हत्या पण दि.१५-१८ या दरम्यान पहाटे मयताचे माहेर लखमापूर शिवारातील मोतेकर यांच्या विहिरीत सुनिता बनबरे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. यावरून लखमापूर येथील रामराव जाधव यांनी मुक्रमाबाद पोलिसांना या घटनेची खबर दिली.

पोलीस पथक मुक्रामाबाद लखमापूर शिवारातील घटनास्थळी येऊन कायदेशीर पंचनामा केला व दिलेल्या खबरीवरून मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सपोनि भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे हे करीत आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्र मुक्रमाबाद येथे मयत महिलेचे श्वविच्छेदन करुण प्रेत नातेवाईकांना देण्यात आले.सुनिता बनबरे यांच्या पार्थिवावर माहेर लखमापुर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मयताच्या पश्चात पत्ती,एक मुलगा ,एक मुलगी असा परीवार आहे.
