Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - महाराष्ट्र - “Special Brief Review Program” announced : “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम” जाहीर -NNL
महाराष्ट्र August 31, 2024

“Special Brief Review Program” announced : “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम” जाहीर -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 31, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई| राज्यातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाकडून राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 (दुसरा)” कार्यक्रम दि.25.06.2024 ते दि.30.08.2024 या कालावधीत राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार आज दि.30.08.2024 रोजी राज्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये, तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

“विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 (दुसरा)” अतंर्गत दि.06.08.2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच प्रारुप याद्यांसाठी दि.06.08.2024 ते दि.30.08.2024 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात आल्या. दि.06.08.2024 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये एकूण मतदार 9 कोटी 36 लाख 75 हजार 934 होती. आता या उपक्रमानंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम मतदार याद्यांनुसार राज्यात एकूण मतदार 9 कोटी 53 लाख 74 हजार 302 एवढे झालेले आहेत. प्रारुप मतदार यादीपेक्षा अंतिम मतदार यादीमध्ये 16 लाख 98 हजार 368 मतदारांची संख्या वाढलेली आहे.

प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने अंतिम मतदार यादीतील मतदारांमधील बदलाचा तपशिल  पुढील तक्त्यात दर्शविल्यानुसार आहे:-

अ.क्र. बाब पुरुष मतदार स्त्री मतदार तृतीयपंथी एकूण
1. दि.06.08.2024 रोजी प्रसिध्द झालेली प्रारुप मतदार यादी 4,86,53,088 4,50,17,066 5,780 9,36,75,934
2. स्वीकारलेले एकूण दावे   8,80,656 11,97,240 185 20,78,081
3. स्वीकारलेल्या एकूण हरकती 1,99,748 1,79,944 21 3,79,713
4. दि.30.08.2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी 4,93,33,996 4,60,34,362 5,944 9,53,74,302
5. प्रारुप मतदार यादीवर मतदारांमधील निव्वळ बदल 6,80,908 10,17,296 164 16,98,368

या कार्यक्रमादरम्यान दि.10, 11 व 17, 18 ऑगस्ट, 2024 या तारखांना मतदार नोंदणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर युवक, महिला, दिव्यांग यांच्याकरिता विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे राज्यातील विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांच्या सहकार्याने राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे अंतिम मतदार यादीमध्ये नवीन युवक मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. प्रारुप मतदार यादीच्या तुलनेमध्ये अंतिम मतदार यादीमधील नवीन मतदारांमध्ये झालेली वाढ पुढीलप्रमाणे आहे. :-

वयोमर्यादा दि.06.08.2024 रोजीची प्रारुप मतदार यादी. दि.30.08.2024 रोजीची अंतीम मतदार यादी. निव्वळ वाढ
18 – 19 14,99,405 18,67,170 3,67,765
20 – 29 1,74,29,276 1,81,84,847 7,55,571

दि. 06.08.2024 रोजीच्या प्रारुप मतदार यादीमध्ये दिव्यांग मतदारांची संख्या 6,06,505 एवढी होती. आता दि.30.08.2024 रोजीच्या अंतीम मतदार यादीनुसार दिव्यांग मतदारांची नोंदणी 6,28,063 इतकी झालेली आहे. त्यानुसार अंतीम मतदार यादीमध्ये दिव्यांग मतदारामध्ये 21,558 इतक्या संख्येने वाढ झालेली आहे.

महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर 925 वरून 933 इतके वाढलेले आहे. या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकतीच्या कालावधीमध्ये नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांना, नोदींमध्ये दुरुस्ती केलेल्या मतदारांना मतदान छायाचित्र ओळखपत्र देण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. या कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी जरी प्रसिद्ध करण्यात आलेली असली, तरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 मध्ये नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी 10 दिवसांपर्यंत नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. 

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अंतिम मतदार यादीमध्ये नागरिकांनी आपली नावे तपासून घ्यावीत व अद्ययावत करावीत. ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांनी अर्ज सादर करून नाव नोंदणी करावी. मतदारांनी आपले नाव जुन्या मतदान केंद्रात नसेल, तर नजिकच्या मतदार केंद्रात असल्याची खात्री करून घ्यावी किंवा व्होटर हेल्प लाईन ॲपवर जाऊन मतदान केंद्राचा पर्याय निवडावा व आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

"Special Brief Review Program" announced
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBan on flying man-made objects with drone cameras : नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध -NNL
Next Article Prime Minister Narendra Modi : वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Himayatnagar : हिमायतनगरात बॅनरबाजीचे उच्छाद… उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन

Himayatnagar News : हिमायतनगरात महावितरणच्या अनधिकृत कामकाजावर प्रशासनाची धडक कारवाई

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

CIDCO ; मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाची मार्च अखेर उदिष्ट पुर्ति कडे वाटचाल, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 टक्के जादा वसुली

April 1, 2025

Enchanted with the singing of : ‘तेरे नाम का दिवाना….!’ च्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध -NNL

October 18, 2024

Pradhan Mantri Awas Gharkul installment : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास घरकुल हप्ता वितरण थेट प्रक्षेपण

February 24, 2025

410 applications were disposed : तक्रार निवारण दिनांचे अनुषंगाने एकुण 410 अर्ज निकाली

January 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Interview of District Collector on water reservoirs and water conservation : पाणीसाठे व जलसंधारण विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी आकाशवाणीचे केंद्रावर मुलाखत – NNL

Shiradhon Kendra’s Education Council is full of enthusiasm : शिराढोण केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न – NNL

Eknath Shinde ; दलित,मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगारांची प्रतिष्ठा वाचावी म्हणून मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा -NNL

Protest for liqour ban ; जवळा मुरहार येथील महिलांचा दारू बंदीसाठी टाहो ; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन

Raju Gaikwad ; दिघीच्या रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाण्यासाठी राजु गायकवाड यांनी केली थेट मंत्रालयात मागणी – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?