“Special Brief Review Program” announced : “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम” जाहीर -NNL
मुंबई| राज्यातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाकडून राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 (दुसरा)” कार्यक्रम दि.25.06.2024 ते दि.30.08.2024 या कालावधीत राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार आज दि.30.08.2024 रोजी राज्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये, तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
“विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 (दुसरा)” अतंर्गत दि.06.08.2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच प्रारुप याद्यांसाठी दि.06.08.2024 ते दि.30.08.2024 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात आल्या. दि.06.08.2024 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रार...
