नवीन नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या सेंटर झोन बास्केटबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक प्राप्त केले. बी. ए.द्वतीय वर्षाच्या कु. पल्लवी भालेराव,बी.ए.द्वितीय वर्षाची कु. साक्षी भालेराव, बी.कॉम तृतीय वर्षाची कु.प्रियंका पांचाळ तर बी.ए. प्रथम वर्षाची टीना रिंदकवाले या विद्यार्थिनींनी संतोष झोन बास्केटबॉल चमकदार कामगिरी केली.


या यशाबद्दल श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव, कोषाध्यक्ष प्रा.ॲड.श्रीनिवास जाधव,प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ. व्ही.आर. राठोड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी यथोचित सत्कार केला.


या कार्यक्रमासाठी डॉ. व्यंकटेश देशमुख,डॉ.संतोष शिंदे, डॉ. साहेबराव शिंदे,से.नि.कार्यालयीन अधीक्षक आर.डी.राठोड यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण विभागप्रमुख व प्रभारी क्रीडा संचालक डॉ.साहेबराव मोरे आणि शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा.डॉ.राहुल सरोदे यांनी मार्गदर्शन केले.




