HomeBlogonline e-crop ; ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना...

online e-crop ; ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचे अनुदान द्यावे…. – NNL

किनवट /परमेश्वर पेशवे | ऑनलाईन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून कापूस व सोयाबीन उत्पादक सरसकट शेतकऱ्यांना सरकारने अनुदान मंजूर करावे असे लेखी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिष्ठमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना दि 12 ऑगस्ट रोजी दिले असून ऑनलाईन पेऱ्याची नोंद न केलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानापासून वंचित ठेवल्यास माजी आ प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात आंदोलन करण्याचा ईशारा बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे व राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बालाजी बामणे यांनी दिला आहे.

खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीकाच्या अनुदानासाठी शासनाने ऑनलाईन ई पीक पेऱ्याची अट घालून दिली आहे.परंतु किनवट माहूर सारख्या मागास दुर्गम व आदिवासी तालुक्यातील हजारो शेतकरी त्यांच्या कापूस व सोयाबिन पिकांची ऑनलाइन नोंदणी करू शकले नाहीत. सन 2023 -24 या हंगामात ई पीक पेरा नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच शासनाच्या अनुदानासाठी पात्र ठरविले जात असून ऑनलाइन नोंदनी न केलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवले जात आहे.

यासंदर्भात माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे व राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बालाजी बामणे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने सहा जिल्हाधिकारी किनवट यांना दि 12 ऑगस्ट रोजी निवेदन सादर केले असून शासनाने ई पीक पेरा नोंदीची अट शिथिल करून किनवट माहूर तालुक्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी केली आहे. महसूल व कृषी विभागाने ग्रामीण भागात जनजागृती केलेली नसल्यामुळे हजारो शेतकरी ई पीक पेरा नोंदणी करू शकले नाही. किनवट तालुका हा आदिवासी मागास व दुर्गम तालुका म्हणून शासन दरबारी नोंद आहे.

या ठिकाणी बंजारा आदिवासी दलित व इतर अल्पसंख्यांक समाज शेती करून उदरनिर्वाह करतो.कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टीमुळे दरवर्षीच किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात येते की. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन ई पिक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना अनुदानासाठी पात्र ठरवावे.ई पीक पेऱ्याची नोंद नसल्याच्या कारनावरून किनवट तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवल्यास माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीच्या शिष्ठमंडळाने निवेदनातुन दिला आहे.

निवेदनावर बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी बामणे,संचालक श्रीराम कांदे, संचालक प्रेमसिंग जाधव, संचालक सुनील घुगे संचालक संजय मुंडे,राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष बंटी पाटील, दहिलेचे सरपंच राकेश तोटावार,रमेश लोभाजी शिंदे,चंद्रशेखर पवणे,बळीराम कागणे,आनंदराव पेंदोर,विठ्ठल राठोड,भानुदास मोठे,रवींद्र चव्हाण ,आशिष नाईक, प्रकाश गोरे, गजानन राठोड, हिरामण राठोड,अशोक नैताम, इंदल राठोड,आकाश राठोड, मुकुंद राठोड, परसराम आत्राम, गजानन ठाकरे, सूर्यभान कुडममेथे, गोविंद धूर्वे, कबीर चव्हाण, विकास नाईक, सतीश नाईक, गजानन मिसेवार,अरविंद पाटील,अनिल सुरोशे,निखिल सरपे,प्रमोद काळे,सुरेश भोसले,सुहास करंजेवार,मनोहर श्रीरामे, कदम परमेश्वर,राजू राठोड,रामेश्वर जाधव,भुजंग पधरे,संग्राम शेवाळे इत्यादी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments