HomeनांदेडAaple Sarkar Seva : आपले सरकार सेवा केंद्र वाटप आता पूर्णपणे ऑनलाईन;...

Aaple Sarkar Seva : आपले सरकार सेवा केंद्र वाटप आता पूर्णपणे ऑनलाईन; पारदर्शक प्रक्रियेला प्राधान्य

नांदेड| आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे शासन निर्णयानुसार गुणांकन करून निवड केली जाणार आहे.

या प्रक्रियेत शैक्षणिक पात्रता व अनुभवाला महत्त्व देण्यात आले आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास ३० गुण, पदव्युत्तर असल्यास २५ गुण आणि सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) चालविण्याचा अनुभव असल्यास २५ गुण देण्यात येणार आहेत.

समान गुण असल्यासच मुलाखत –  एखाद्या गावासाठी एकापेक्षा अधिक अर्जदारांचे गुण समान असल्यासच मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीसाठी एकूण २० गुण निश्चित करण्यात आले असून, त्यात तांत्रिक ज्ञानासाठी ६ गुण, लोकसेवा हक्क अधिनियम २०२५चे ज्ञानासाठी ४ गुण आणि सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यासाठी १० गुण राखीव आहेत.

उच्चस्तरीय समितीद्वारे निवड प्रक्रिया – मुलाखत प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीद्वारे पार पडणार आहे. या समितीत पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून सहभागी असणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

अर्जदारांना प्रशासनाचे आवाहन – अर्जदारांनी प्रक्रिया, सूचना व अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी. अनावश्यकपणे कार्यालयाशी संपर्क साधू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या ऑनलाईन प्रक्रियेमुळे सेवा केंद्र वाटपात पारदर्शकता वाढणार असून पात्र उमेदवारांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments