Wednesday, May 13

Tag: allocation now completely online

Aaple Sarkar Seva : आपले सरकार सेवा केंद्र वाटप आता पूर्णपणे ऑनलाईन; पारदर्शक प्रक्रियेला प्राधान्य

Aaple Sarkar Seva : आपले सरकार सेवा केंद्र वाटप आता पूर्णपणे ऑनलाईन; पारदर्शक प्रक्रियेला प्राधान्य

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे शासन निर्णयानुसार गुणांकन करून निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेत शैक्षणिक पात्रता व अनुभवाला महत्त्व देण्यात आले आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास ३० गुण, पदव्युत्तर असल्यास २५ गुण आणि सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) चालविण्याचा अनुभव असल्यास २५ गुण देण्यात येणार आहेत. समान गुण असल्यासच मुलाखत -  एखाद्या गावासाठी एकापेक्षा अधिक अर्जदारांचे गुण समान असल्यासच मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीसाठी एकूण २० गुण निश्चित करण्यात आले असून, त्यात तांत्रिक ज्ञानासाठी ६ गुण, लोकसेवा हक्क अधिनियम २०२५चे ज्ञानासाठी ४ गुण आणि सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यासाठी १० गुण राखीव आहेत. उच्चस्तरीय समितीद्व...
error: Content is protected !!