HomeकृषीBig relief for farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा: दोन लाखांपर्यंत शेती कर्जावरील...

Big relief for farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा: दोन लाखांपर्यंत शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क पूर्ण माफ

नांदेड| महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत शेती किंवा पीक कर्जावरील दोन लाखांपर्यंतचे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व बँका व वित्तीय संस्थांना तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक, पुणे यांनी जारी केलेल्या सूचनांनुसार, शासन अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित विविध कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. यात अभिस्वीकृती पत्र, रोखपत्र करारनामा, हक्कविलेख निक्षेप, तारण/गहाणखत, हमीपत्र, प्रतिभूती बंधपत्र, तसेच गहाणाशी संबंधित सूचनापत्र किंवा घोषणापत्र यांचा समावेश आहे.

दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी लागू असलेली ही मुद्रांक शुल्क माफी शेतकऱ्यांच्या आर्थिक भारात मोठी घट करणारी ठरणार आहे. शासनाने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments