Pandharwada ; जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात दुसऱ्या दिवशी गुणनियंत्रण प्रशिक्षण

नांदेड | राज्याच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार 15 ते 30 एप्रिल या काळात आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणाऱ्या नांदेड पाटबंधारे विभागाने दुसरा दिवस गुणनियंत्रण प्रशिक्षणाने साजरा केला. 30 एप्रिल पर्यंत जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन अधिक्षक अभियंता अजय दाभाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे.

काल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्ह्यातील जलव्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत विविध मान्यवर तसेच शेतकरी, पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विभागस्तरावरील शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. आज दुसऱ्या दिवशी जलसंपदा अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. उद्या 17 एप्रिलला जिल्ह्यातील विविध कार्यालयामध्ये स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय तसेच जलपूर्नभरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

आज उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (भूविकास) विभाग नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात सहाय्यक अभियंता तारेख नदीम यांनी मंडळांतर्गत कार्यरत सर्व तांत्रिक अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेतले. यावेळी गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती एस.सी. डोंगळीकर, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. जगताप, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (भूवि) विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. बिराजदार, नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) कार्यकारी अभियंता ए. एस. चौगले, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर)चे कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड, विष्णुपूरी प्रकल्प विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता पी. आर. मुदगल, देगलूर लेंडी प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.पी. तिडके, वसमतनगर पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. बिराजदार यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button