प्रधान सांगवी ते कोठारी शेतकऱ्याच्या सामोपचाराने शिवहदीचा प्रश्न निकाली -NNL

किनवट,परमेश्वर पेशवे। प्रधानसांगवी ते कोठारी दरम्यानच्या शिवसरहद्दीवर दोन्ही बाजुच्या शेतकर्यांनी केलेले प्रदीर्घ काळापासूनचे अतिक्रमन तलाठी यु.आर.जाधवांनी आज (५ जुलै २०२४) सामोपचारातून मार्ग काढून शिवसरहद्द खुल्ली केल्याने सर्वच शेतकर्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.


अनेक वर्षापासूनच्या भावकी वादातून हा सर्व शेतकर्यांच्या रस्त्याचा पेचप्रसंग निर्माण झाला होता. दरम्यानच्या कालखंडात अनेक तलाठी आले आणि गेले पण यावर तोडगा निघू शकला नव्हता. अशाही किच्चकट परिस्थितीत दोन्हीही पक्षकारांना विश्वासात घेऊन शिवसरहद्द सिमा निश्चीत केल्याने तलाठी जाधवांना प्रधानसांगवीकरांनी “सिंघम”ची उपमा दिली हे विशेष.

एक्करभर जमिन पडीत असते परंतू इंचभर धुर्यासाठी माणूस कोणत्याही टोकाला पोहोचल्याच्या अनेक घटना पहायला मिळतात. प्रधानसांगवी ते कोठारी दरम्यानच्या शिवसरहद्दीवरही प्रधानसांगवीतील गोपाळराव मुंडे आणि दिगांबरराव मुंडे यांच्यातील भावकी वादातून अतिक्रमनयुक्त रस्ता केल्याने अलिकडच्या पलिकडच्या शेतकर्यांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. कांही वेळेला त्यांच्या रोषाला बळी पडावे लागत होते.


महसूल स्तरावर फेर्या मारण्याचा प्रसंग. ही बाब कोणालाही परवडणारी नव्हती. अशा वेळी तलाठी यु.आर.जाधवांनी तहसिलदार शारदा चौढेकरांच्या मार्गदर्शनाखाली दोन्हीही मुंडे पक्षकारांना विश्वासात घेऊन ५ जुलै रोजी गावकर्यांच्या उपस्थितीत सामोपचारातून शिवसरहद्द अतिक्रमनमुक्त करण्यात त्यांना यश मिळाले. प्रदीर्घकालीनचे अतिक्रमन वादविरहीतपणे काढल्याने नागरीकांनी अक्षरष: तलाठी जाधवांना “सिंघम”ची उपमा दिल्याचे ऐकायला मिळाले.




