Wednesday, May 13

Tag: of Pradhan Sangvi and Kothari farmer

प्रधान सांगवी ते कोठारी शेतकऱ्याच्या सामोपचाराने शिवहदीचा प्रश्न निकाली -NNL

प्रधान सांगवी ते कोठारी शेतकऱ्याच्या सामोपचाराने शिवहदीचा प्रश्न निकाली -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। प्रधानसांगवी ते कोठारी दरम्यानच्या शिवसरहद्दीवर दोन्ही बाजुच्या शेतकर्‍यांनी केलेले प्रदीर्घ काळापासूनचे अतिक्रमन तलाठी यु.आर.जाधवांनी आज (५ जुलै २०२४) सामोपचारातून मार्ग काढून शिवसरहद्द खुल्ली केल्याने सर्वच शेतकर्‍यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अनेक वर्षापासूनच्या भावकी वादातून हा सर्व शेतकर्‍यांच्या रस्त्याचा पेचप्रसंग निर्माण झाला होता. दरम्यानच्या कालखंडात अनेक तलाठी आले आणि गेले पण यावर तोडगा निघू शकला नव्हता. अशाही किच्चकट परिस्थितीत दोन्हीही पक्षकारांना विश्वासात घेऊन शिवसरहद्द सिमा निश्चीत केल्याने तलाठी जाधवांना प्रधानसांगवीकरांनी "सिंघम"ची उपमा दिली हे विशेष. एक्करभर जमिन पडीत असते परंतू इंचभर धुर्‍यासाठी माणूस कोणत्याही टोकाला पोहोचल्याच्या अनेक घटना पहायला मिळतात. प्रधानसांगवी ते कोठारी दरम्यानच्या शिवसरहद्दीवरही प्रधानसांगवीतील गोपाळराव मुंडे आणि द...
error: Content is protected !!