नांदेड। आंतर जिल्हा मोटारसायकल चोरी आणि घरफोडी करणारे दोन आरोपीनां इतवारा पोलीसांनी अटक करुन सोन्याचांदीचे दागीने व ०४ मोटार सायकल असा 1,77,600/- रु. चा ऐवज हस्तगत केल्याची कार्यवाही केली आहे. या कार्यवाही बद्दल सर्व स्तरातून पोलिसांचे अभिनंदन केले जाते आहे.

नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड खंडेराय धरणे, उप विभागिय पोलीस अधिकारी इतवारा, अति. पदभार नांदेड शहर सुशिलकुमार नायक यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या तसेच पो.स्टे. अंतर्गत पेट्रोलिंग ठेवुन गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या सुचना दिल्या होत्या.

वरीष्ठांनी वरील प्रमाणे सुचना दिल्यावरुन पो.स्टे. इतवारा नांदेड येथील पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. इतवारा गुन्हे शोध पथकाचे पोउपनि रमेश गायकवाड, प्रो पोउपनि विलास पवार, ASI बाबा गजभारे, AS। देविदास बिसाडे पोहेकॉ/664 मोहन हाके, पोहेकों 436 एकनाथ मोकले, पोना 2543 हबीब चाऊस, पोना 2556 लक्ष्मण दासरवाड, पोना 2117 धिरज कोमुलवार, पोकॉ/2908 काकासाहेब जगताप, पोकों /2890 रेवणदास कोळनुरे पाकॉ/471 नजरेआजम देशमुख, पोकों 3067 महमद जावेद, पोकों /493 संघरत्न गायकवाड यांनी संयुक्तरित्या गुप्त बातमीदार नेमुन व अभिलेखावरील गुन्हेगारांची माहीती घेतली.

आणि दिनांक 12.08.2024 रोजी गोपनिय बातमीदारांचे खात्रशिर बातमीवरुन दोन पंचासह मालटेकडी ब्रिज चे खाली छापा मारुन दोन सराईत गुन्हेगार 1. महमद ऐजाज उर्फ बॅनेट पिता महमद अकबर वय 34 वर्षे, व्यवसाय मेकॅनिक रा. गंगानगर देगलुरनाका नांदेड, ह. मु. खडकपुरा नांदेड 2. शेख अदनान सोहेल पिता शेख कासिम वय 22 वर्षे व्यवसाय मजुरी रा. गंगानगर टायरबोर्ड इतवारा नांदेड यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन सोन्याचांदीचे दागीने व 04 मोटारसायकल असा 1,77,600/- रु. चा ऐवज हस्तगत केला आहे.

सदर आरोपीना विचारपुस केल्यानंतर 1. इतवारा गुरनं. 311/2024 कलम 303 (2) बीएनएस 2. पो.स्टे. लिंबगांव गुरनं. 171/2023 कलम 379 भादंवी 3. पो.स्टे. हिंगोली शहर गुरनं. 520/2024 कलम 303(2) वीएनएस 4. पो.स्टे. हिंगोली शहर गुरनं. 555/2024 कलम 303(2) बीएनएस ई गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच सदर आरोपींनी 5. पो. स्टे इतवारा नांदेड गुरनं. 48/2024 कलम 457,380 भादंवी प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयाची घरफोडी केल्याची कबुली दिली असुन सदर आरोपीकडे मुदेमाल हस्तगत करण्याची कार्यवाही सुरु आहे.