Homeनांदेडप्रधान सांगवी ते कोठारी शेतकऱ्याच्या सामोपचाराने शिवहदीचा प्रश्न निकाली -NNL

प्रधान सांगवी ते कोठारी शेतकऱ्याच्या सामोपचाराने शिवहदीचा प्रश्न निकाली -NNL

किनवट,परमेश्वर पेशवे। प्रधानसांगवी ते कोठारी दरम्यानच्या शिवसरहद्दीवर दोन्ही बाजुच्या शेतकर्‍यांनी केलेले प्रदीर्घ काळापासूनचे अतिक्रमन तलाठी यु.आर.जाधवांनी आज (५ जुलै २०२४) सामोपचारातून मार्ग काढून शिवसरहद्द खुल्ली केल्याने सर्वच शेतकर्‍यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

अनेक वर्षापासूनच्या भावकी वादातून हा सर्व शेतकर्‍यांच्या रस्त्याचा पेचप्रसंग निर्माण झाला होता. दरम्यानच्या कालखंडात अनेक तलाठी आले आणि गेले पण यावर तोडगा निघू शकला नव्हता. अशाही किच्चकट परिस्थितीत दोन्हीही पक्षकारांना विश्वासात घेऊन शिवसरहद्द सिमा निश्चीत केल्याने तलाठी जाधवांना प्रधानसांगवीकरांनी “सिंघम”ची उपमा दिली हे विशेष.

एक्करभर जमिन पडीत असते परंतू इंचभर धुर्‍यासाठी माणूस कोणत्याही टोकाला पोहोचल्याच्या अनेक घटना पहायला मिळतात. प्रधानसांगवी ते कोठारी दरम्यानच्या शिवसरहद्दीवरही प्रधानसांगवीतील गोपाळराव मुंडे आणि दिगांबरराव मुंडे यांच्यातील भावकी वादातून अतिक्रमनयुक्त रस्ता केल्याने अलिकडच्या पलिकडच्या शेतकर्‍यांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. कांही वेळेला त्यांच्या रोषाला बळी पडावे लागत होते.

महसूल स्तरावर फेर्‍या मारण्याचा प्रसंग. ही बाब कोणालाही परवडणारी नव्हती. अशा वेळी तलाठी यु.आर.जाधवांनी तहसिलदार शारदा चौढेकरांच्या मार्गदर्शनाखाली दोन्हीही मुंडे पक्षकारांना विश्वासात घेऊन ५ जुलै रोजी गावकर्‍यांच्या उपस्थितीत सामोपचारातून शिवसरहद्द अतिक्रमनमुक्त करण्यात त्यांना यश मिळाले. प्रदीर्घकालीनचे अतिक्रमन वादविरहीतपणे काढल्याने नागरीकांनी अक्षरष: तलाठी जाधवांना “सिंघम”ची उपमा दिल्याचे ऐकायला मिळाले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments