किनवट, परमेश्वर पेशवे| नाट्यमय घडामोडीनंतर ग्रामपंचायत कार्यालय नागझरी च्या उपसरपंच पदी पुष्पाबाई कुंडलसिंग नाईक धिरबसी यांची बिनविरोध निवड झाली.


ग्रामपंचायत कार्यालय नागझरी येथे तहसिलदार डॉ. चौंडकरांच्या अध्यक्षतेखाली १२ जून २०२५ रोजी विशेषसभा पार पडली होती. १२ जूनच्या ग्रामपंचायतीच्या विशेषसभेत सात विरुद्ध एक मताने अविश्वास पारीत झाल्याने माजी उपसरपंच राजू मुंडेंना पदाला मुकावे लागले यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर आज दिनांक ०२ जुलै २०२५ रोजी सरपंच प्रदीप तुमराम यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.


यात उपसरपंच पदी पुष्पाबाई कुंडलसिंग नाईक धिरबसी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी पिठासिन अधिकारी म्हणून पंचायत समिती किनवटचे विस्तार अधिकारी के गायकवाड यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत अधिकारी रेणुका शामराव चिकराम यांची उपस्थिती होती. राजू मुंडे ,वैशाली मनोजकुमार विनकरे, सुनिता रामदास तुमराम, रामदास केशव तुमराम, शत्रुघ्न भागोराव रहाटे, हे सर्व सदस्य उपस्थित होते.




