किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट हा आदिवासी बहुल आणि डोंगराळ भाग अशी याची ओळख आहे. जिल्ह्यापासून किनवट जेवढा दूर आहे त्याहीपेक्षा किनवट तालुका हा सरकारी योजना आणि अधिकारापासून वंचित आहे. देशात एक देश एक रेशन योजना गाजत असली तरीही (One Nation One Ration Scheme is being sabotaged in Kinwat, complaints of taking Rs 20 from the poor for ration) किनवट मध्ये मात्र या योजनेचा विटाळ असल्याच भयाण वास्तव समोर आलं आहे.


किनवट मधील रामनगर भागातील बहुतांश लोक मजुरी करून पोट भरतात. ज्याचे त्यांना दिवसाला 50 ते 100 रुपये मिळतात. अशाच गरीब नागरिकांसाठी मोदि साहेबांनि मोफत रेशन योजना आणली पण प्रत्यक्षात मात्र रेशन दुकानदार या गरीब मजु्रांकडून 20 ते 50 रुपये आकारात आहेत. जे कि थेट पंतप्रधाननाच आव्हान देण्याचा प्रकार हे दुकानदार करत आहेत. परंतु अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय रेशन विक्रेत्यांचे हे बस्तान मांडण शक्यच नाही.

अन्न,वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु या मूलभूत गरजामध्ये प्रमुख गरज म्हणजे अन्न. 2019 मध्ये जगभरात कोरोनाच सावट पसरल असताना भारताचे संवेदनशील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सर्व शिधा धारकांना शिधा सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावा यासाठी करोडो रुपये मार्गी लावून ‘एक देश एक रेशन’ ही योजना आमलात आणली. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सवलतीनुसार देशातील कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळवू शकता आणि या योजनेचे देशभरात कौतुकही झालं.

पण खरंच या योजनेत नमूद असल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या सवलतीनुसार कुठूनही रेशन मिळवू शकता याचा आम्ही आढावा घेतला असता नांदेडच्या किनवट तालुक्यात मात्र या योजनेचा आणि रेशनचा काडीमात्र संबंध नसल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही तुमच्या सवलतीनुसार जर दुसऱ्या रेशन दुकानात रेशन घेण्यास गेलात तर तुम्हाला इथे रेशन मिळणार नाही असं सांगण्यात येत आणि तुम्ही जर ‘एक देश एक रेशन’योजनेबद्दल त्यांना प्रश्न केला तर डोळे वटारून तुम्हाला गप्प केल जातं. व तुम्हाला तिथून काढता पाय घ्यावा लागतो.


देशामध्ये कोरोना महामारीपासून रेशन मोफत मिळत असताना किनवटमध्ये मात्र या रेशनसाठी रेशन धारकांकडून जबरी 20 रुपये आकारले जातं असल्याच भयाण वास्तव समोर आलं आहे. जर हे 20 रुपये देण्यास तुम्ही टाळाटाळ केली तर लगेच दुकानातील माल संपला हे सांगून तुमच्या रेशन पासून तुम्ही हात धुवून बसता. या सर्व प्रकारबाबत जेव्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क केला तेव्हा त्यांनी मात्र असं काही घडतंच नसल्याचा आव आणला. परंतु जेव्हा त्यांना आम्ही केलेल्या ग्राउंड रिपोर्ट बद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी दोषीवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय.
याबाबत किनवट नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अभय महाजन यांना संपर्क केला असता या संदर्भात याआगोदरही अनेक तक्रारी अधिकाऱ्यांकडे गेल्या परंतु ‘मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर म्हणत कारवाईनंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या हेच प्रकार घडतात. त्यामुळे यावर कठोर कारवाई करून जोवर दोषीना शिक्षा होत नाही तोवर हे प्रकार चालूच राहणार, कारण या रेशन विक्रेत्यांना अधिकाऱ्यांचेही पाठबळ आहे असं विधान यांनी केले तसेच यावेळी जर यावर कठोर कारवाई झाली नाही तर महिलांना घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढू असंही महाजन यावेळी म्हणाले.