Kinwat forest : कुंपणच शेत खात असेल तर ! किनवटचा जंगल भविष्यात वाळवंट होणार?

किनवट, परमेश्वर पेशवे| मालकी पट्ट्याच्या नावाखाली बिगर परवानगीच्या ठिकाणची वृक्ष तोड करुन सर्रास परवानगीच्या लाकडात मिसळून वनविभागाच्या आशीर्वादाने लाकूड लांबवल्या जाते. वनविभागाच्या जंगलातील वृक्षतोड केलेल्या लाकडाला वनविभाग वाहतूक पासेस देऊन लांबवण्यास मदत (If the fence is eating the field! Kinwat forest will be a desert in the future?) केली जाते. सारखणी घाटात मृतावस्थेतील बिबट्यावाघ लांबवला त्याचा पाच महिन्याचा काळ लोटला तरीही शोध लागलेला नाही. हा बिबट्यावाघ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यामुळे चर्चेचा विषय ठरला. परंतू सर्वांच्या नजरेआडून वन्यप्राणी, जंगलातील वृक्ष, मुरुम, दगड सुरक्षीत असेलच यावर एकूनच घटनांवरून संशयाला थारा मिळतोय. कुंपणच शेत खात असेल तर भविष्यात किनवट तालुका हा वनराईने नटलेला वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. अशा खोचक प्रतिक्रिया वनप्रेमी देत आहेत.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, वर्षानवर्षापासून किनवट तालुक्यात सेवेच्या नावाखाली ठाण मांडून बसलेल्यांच्या बदल्या केल्या जात नसतील तर जंगल आणि वन्यप्राणी नामशेष व्हायला फारसा काळ लागणार नसल्याची अनेकांनी चिंता व्यक्त केलीय. मृत बिबट्यावाघ चोरी गेल्याचे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत असलातरी तपासकामी असलेल्या पथकाने हा सूर्य हा जयद्रत दाखवायलाच पाहिजे. स्थानिक प्रशासनातील कांही अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कर्तव्याप्रती तरी संवेदनशील आहेत का ? यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतांना दिसते.

सतत जंगलातील वृक्ष तोड, सबब मालकी पट्ट्याची आणि वृक्ष तोड होते सभोवतालच्या आदिवासी, बिगर आदिवासी, गायरानातील, जंगला लागून असलेल्या क्षेत्रातील, बारमाही वाहणार्या नाल्यातील, नाल्या किनारी असलेली, पांदन रस्त्यासह दोन गावच्या शिव सरहद्दीतील सर्रास वैध-अवैध वृक्ष तोड होत असतांनाच्या लगातार तक्रारींचा वाढता आलेख लक्षात घेतल्यानंतरही यंत्रणेला जराही घाम आलेला दिसत नाही. साधी चौकशी देखिल करीत नाहीत. त्याचा दुरगामी परिणाम म्हणून वृक्ष तोडीच्या प्रमाणात दिवसागणीक प्रचंड वाढ होतांनाचे अगदी स्पष्ट चित्र आहे. मालकी पट्ट्यातील वृक्ष तोडीनंतरच्या नियम, अटी, शर्थींचे पालन केले जाते काय ? तर बिलकूल नाही. २७ आँक्टोबर २०२४ च्या रात्री बिबट्यावाघ अज्ञात वाहणाच्या धडकेत मृत्यू पावल्याचे प्रत्यक्षदर्शीतांनी व्हीडीओ चित्रण करुन समाजमाध्यमावर व्हायरल केले. तदोपरांत मृत बिबट्यावाघच अज्ञातांनी पळवल्याची सर्वत्र चर्चेला उधान आले.


मुख्य वनसंरक्षक, उपवन संरक्षक, सहायक वनसंरक्षकांसह अनेक अधिकार्यांनी जायमोक्याची पहाणी केल्याचे तत्कालीनचे वृत्त होते. पशु संवर्धन विभागाच्या टीमने सारखणी घाटातील रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ठिकाणच्या रक्ताची नमुने घेऊन प्रयोग शाळेला पाठवलेत त्याचा अहवाल अद्यापही समोर आणला नाही. अज्ञातांविरुद्ध मांडवी वनपरिक्षेत्रात कोणकोणत्या गुन्ह्याच्या नोंदी घेतल्या या बद्धलची वाच्चता होऊ दिलेली नाही.

पत्रकारांनीही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतू साधी माहिती देखिल मिळू नये अशी यंत्रणेने व्यवस्था केलेली दिसते. पाच महिन्याचा काळ लोटतोय तरीही बिबट्यावाघाचा शोध लागलेला नाही. भविष्यात लागेल की नाही ? या बद्धल यंत्रणा तोंड उघडायला तयार नाही. यंत्रणेचे अपयश झाकण्यासाठी वरिष्ठ यंत्रणा पाठराखण करणार काय ? असा सवाल पर्यायाने व्यक्त होतांना ऐकायला मिळतो. म्हणजे यंत्रणेच्या मनमर्जीप्रमाणे मालकशाही पद्धतीने प्रशासन चालवणार काय ? असा सर्वसामांन्यांचा सवाल आहे.



