HomeनांदेडCollector ; राज्य शासनाच्या महिला विषयक धोरणांची मांडणी मेळाव्यातून व्हावी : जिल्हाधिकारी...

Collector ; राज्य शासनाच्या महिला विषयक धोरणांची मांडणी मेळाव्यातून व्हावी : जिल्हाधिकारी – NNL

नांदेड| नवा मोंढा मैदानावर सात ऑक्टोबरला होणाऱ्या महिला सक्षमीकरणाच्या मेळाव्याची तयारी प्रशासन करत असून जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणा संदर्भात यशस्वी झालेल्या वेगवेगळ्या योजना व उपक्रमांची योग्य मांडणी करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा त्यांनी आज घेतला.

राज्य शासनाच्या पथदर्शी योजनातून मोठ्या प्रमाणात निधी सामान्य जनतेपर्यंत पोहोचला आहे.अनेक योजना, उपक्रमातून अनेकांना लाभ मिळाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणेमार्फत कृषी,महिला, युवक, कामगार, महिला बचत गट, शिक्षण महिला सक्षमीकरण आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे या सर्व निर्णयाचे प्रतिबिंब या मेळाव्यात दिसायला हवेत अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

WhatsApp Image 2024 10 03 at 7.57.36 PM 1 Collector ; राज्य शासनाच्या महिला विषयक धोरणांची मांडणी मेळाव्यातून व्हावी : जिल्हाधिकारी - NNL

सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येणाऱ्या महिलांच्या प्रवासाची खाणपणाची आरोग्याची तसेच सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून ज्याला जे काम नेमून दिले ते जबाबदारी करण्याची सूचनाही त्यांनी या बैठकीत केली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी कोल्हे, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

राज्य शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले असून या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांमधील लाभार्थ्यांची संवाद साधने व त्यांना प्रत्यक्ष या योजनाचा कार्यक्रमांमध्ये लाभ देणे सुरू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत कार्यक्रम झाले असून आता नांदेडमध्ये देखील ७ ऑक्टोबरला हा कार्यक्रम होणार आहे.

नवा मोंढा येथील मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले असून शेकडो पैठणीचे वाटपही होणार आहे. महिलांसाठी वाहन व्यवस्था करण्यात आली असून यासंदर्भात यंत्रणेकडून महिलांशी संपर्क साधणे सुरू आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments