हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरात वर्दळीच्या ठिकाणी व मुख्यचौकात मुञीघर नसल्याने व्यापा-यासह नागरिकांची मोठी कुंचबना होत आहे. तर बाहेर गावाहुन आलेल्या स्ञीयांची फार कुंचबणा होत असून, हा प्रकार निव्वळ नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ऐखाद्या जागरुक नागरिकाने किवा माध्यमाने सामाजिक दृष्टिकोनातून केलेल्या सुचनाची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात येत नाही. आता तरी प्रभारी आलेल्या मुख्याधिकारी लक्ष देतील का..? आसा सवाल नागरिकात विचारला जात आहेत.
हदगाव शहरात आठवठी बाजारात व तामसा टी पाईटवर गैरसोयीच्या ठिकाणी सुलभ शौचालय आहे. पण नवीन आलेल्या व्यक्तिना त्याचा काहीच उपयोग होतांना दिसुन येत नाही. शहरात उपजिल्हारुग्णालय मध्ये शौचालय आहे पण ते अध्याप सुरु करण्यात आलेले नाही. नेमके हे शौचालय मध्ये निकामी मटेरियल भरण्यात आलेले असुन ते शौचालय नेमके न.पा.प्रशासनाने बाधले की उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने बाधले याचा प्रशासनाकडून थांगपता लागत नाही. केवळ कञांटदाराच्या सोयी करिता कोणतेही नियोजन न करता रुग्णालयाच्या आवारात बाधलेले आहे ते आध्यप ही सुरु करण्यात आलेले नाही.
शहरात पोलिस स्टेशनच्या परिसरात पुरुषाचे मुञी घर आहे. परंतु दुर्गधीने दयनिय आवस्था झालेली असते व्यापारी व नागरिकांना लंघुशकेसाठी भटकावे लागत असल्याने नगरपालिका प्रशासना बाबतीत संताप व्यक्त होतांना दिसुन येत आहे. ह्या आठवडी बाजार व जुन्या तहसिलच्या परिसरात असलेल्या पुरुषाच्या मुञीघराचे अस्वच्छते मुळे नाली तुबल्यामुळे तिथे जाणे तर,सोडाच जवळ जरी गेले तरी दुर्गधीने नागरिकाना उलट्या होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नगरपालिका प्रशासनाच्या अश्या कार्यशैली मुळे नागरिक ञस्त आहेत. नगरपालिकेत प्रभारी प्रशासक असल्याने त्याना नागरिकाच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही सभागृहाची ठरावाची गरज नाही. तरी नगर परिषद प्रशासनाने याचे गार्भिय ओळखुन शौचालयाची स्वच्छता करावी. तहसिल परिसर उपजिल्हारुग्णालय, नगरपालिका, जुने बस्थानक, स्टेट बँक परिसर, सरकारी गोडाऊन परिसर अश्या महत्त्वाचे ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करुन हदगाव शहरवासी परिसरातील ञासातुन मुक्त करण्याची मागणी होत आहे.