नांदेड| धर्माबाद पोलीसांनी घरफोडी करणा-या आरोपीस २४ तासात अटक करुन चोरीला गेलेला १००% मुद्येमाल जप्त केला आहे, पोलिसांच्या कार्यतत्परतेचं सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश ऑउट अतंर्गत अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत व मालमत्तेविरूध्दचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत पोलीस निरीक्षक, धर्माबाद यांना आदेशीत केले होते. त्यानुसार बाळासाहेब रोकडे पोलीस निरीक्षक यांनी लागलीच एक पथक स्थापन करुन पथकास गुन्हा उघडकिस आणण्याबाबत सुचना देवुन रवाना केले. पथकाने शिताफीने संशयीत व्यक्ती नामे श्रीकांत विठ्ठल बनसोडे रा. बेल्लुर बु ता.धर्माबाद यास ताब्यात घेवुन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास अटक करुन गुन्हयातील चोरीस गेलेला माल १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने १००% मुद्येमाल आरोपीकडुन हस्तगत करुन जप्त केला आहे.
लक्ष्मण मोहनराव रामपुरे वय ३५ वर्ष व्यवसायशेती रा शेळगाव (धडी). ह.मु गणेश नगर धर्माबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि.१३.१२.२०२४ चे१० ते ११ वा दरम्याण घरी कुणी नसल्याची साधी साधून गणेश नगर धर्माबाद जि. नांदेड येथून अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. याबाबत ३४४/२०२४कलम ३३१(३),३०५ (अ) भा.न्या.स अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेच्या तपासासाठी मिळालेल्या गुप्त माहितीवरून धर्माबाद पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी श्रीकांत विठल बनसोडे वय २७ वर्ष व्यवसाय खाजगी चालक रा. बेल्लुर बु ता धर्माबाद यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. आणि त्याच्याकडून चोरी केलेल्या १.१२००००-/ दोन सोन्याच्या पाटल्या ज्याचे वजन ३९.५५ ग्राम वजनाचे, २.९५४३०-/ एक सोन्याचा पोहेहार ज्याचे वजन ३१.८१ ग्राम वजनाचे. ३.७५२७०-/ एक सोन्याचा नानु हार ज्याचे वजन २५.०९ ग्राम वजनाचे.४.२७०६०-/ दोन सोन्याचे अंगठया ज्याचे वजन ९.०२ ग्राम वजनाचे. ५. ३९१५०-/ एक सोन्याचे लॉकेट ज्याचे वजन १३.०५ ग्राम वजनाचे. ६. २०७३०-/ दोन सोन्याचे जुमके ज्याचे वजन ६.९१ ग्राम वजनाचे.७. १६८००-/ एक सोन्याचे लॉकेट ज्याचे वजन ५.६० ग्राम वजनाचे. असा एकुण वजन १३२.४७ ग्राम एकुण किमंती ३,९४,४४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हि कार्यवाही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड. खंडेराय धरणे अपर पोलीस अधिक्षक, भोकर, प्रशांत संपते उपविभागीय पोलीस अधिकारी, धर्माबाद यांचे आदेशानुसार बाळासाहेब रोकडे पोलीस निरीक्षक पो.स्टे. धर्माबाद यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील मपोउपनि प्रियंका पवार, पोहेकॉ-२००६ विलास मुस्तापुरे, पोहेकॉ/११८१ संतोष कुमरे, पोहेकॉ/७२४ महेश माकुरवार, पोलीस अमंलदार/३८५ सचिन गडपवार, पोअं/३०३४ सय्यद फहीम, पोअं/१५९७ किरण मोरे यांनी केली आहे.