Thursday, May 14

Tag: 94

Dharamabad Police Arrested : धर्माबाद पोलीसांनी घरफोडी करणा-या आरोपीस २४ तासात अटक; ३,९४,४४० रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

Dharamabad Police Arrested : धर्माबाद पोलीसांनी घरफोडी करणा-या आरोपीस २४ तासात अटक; ३,९४,४४० रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| धर्माबाद पोलीसांनी घरफोडी करणा-या आरोपीस २४ तासात अटक करुन चोरीला गेलेला १००% मुद्येमाल जप्त केला आहे, पोलिसांच्या कार्यतत्परतेचं सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश ऑउट अतंर्गत अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत व मालमत्तेविरूध्दचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत पोलीस निरीक्षक, धर्माबाद यांना आदेशीत केले होते. त्यानुसार बाळासाहेब रोकडे पोलीस निरीक्षक यांनी लागलीच एक पथक स्थापन करुन पथकास गुन्हा उघडकिस आणण्याबाबत सुचना देवुन रवाना केले. पथकाने शिताफीने संशयीत व्यक्ती नामे श्रीकांत विठ्ठल बनसोडे रा. बेल्लुर बु ता.धर्माबाद यास ताब्यात घेवुन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास अटक करुन गुन्हयातील चोरीस गेलेला माल १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने १००% मुद्येमाल आर...
error: Content is protected !!