Neglect of municipal council : हदगाव शहरात मुञीघर नसल्याने महिलांची होतय कुचंबणा – नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष -NNL
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरात वर्दळीच्या ठिकाणी व मुख्यचौकात मुञीघर नसल्याने व्यापा-यासह नागरिकांची मोठी कुंचबना होत आहे. तर बाहेर गावाहुन आलेल्या स्ञीयांची फार कुंचबणा होत असून, हा प्रकार निव्वळ नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ऐखाद्या जागरुक नागरिकाने किवा माध्यमाने सामाजिक दृष्टिकोनातून केलेल्या सुचनाची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात येत नाही. आता तरी प्रभारी आलेल्या मुख्याधिकारी लक्ष देतील का..? आसा सवाल नागरिकात विचारला जात आहेत.
हदगाव शहरात आठवठी बाजारात व तामसा टी पाईटवर गैरसोयीच्या ठिकाणी सुलभ शौचालय आहे. पण नवीन आलेल्या व्यक्तिना त्याचा काहीच उपयोग होतांना दिसुन येत नाही. शहरात उपजिल्हारुग्णालय मध्ये शौचालय आहे पण ते अध्याप सुरु करण्यात आलेले नाही. नेमके हे शौचालय मध्ये निकामी मटेरियल भरण्यात आलेले अस...
