नांदेडदेश विदेश

Cm Pramod Sawant ; गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

गोवा सरकारच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा विशेष सन्मान
फोंडागोवा/सच्चिदानंद परब्रह्म डॉआठवलेनगरी। पूर्वी गोव्यात लोक समुद्रतसेच अन्य गोष्टी पहाण्यासाठी येत होतेयाउलट गोव्यात सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यावर नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पहाण्यासाठी गोव्यात येतातगोवा भोगभूमी नसून ही देवभूमी आहेसनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सव यांमुळे येथील अर्थकारण आणि सांस्कृतिक पर्यटन वाढेलगेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून सनातनने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती युवक यांना प्रेरणा देणारी आणि पुढील १०० वर्षांपर्यंत दिशादर्शक आहेसनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहेअसे गौरवोद्गार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉप्रमोद सावंत यांनी काढले.
Attendence 2 Cm Pramod Sawant ; गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फार्मागुडीफोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहेत्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होतेया प्रसंगी मुख्यमंत्री डॉप्रमोद सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत आठवले यांना शालश्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केलातर देशाच्या संरक्षण कार्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत आठवले यांच्या हस्ते मुख्ममंत्री डॉप्रमोद सावंत यांच्याकडे साहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला.
या महोत्सवासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत आठवले आणि सौकुंदा जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीसह २३ देशांतील १९ हजारांहून अधिक भाविक उपस्थित आहेतप्रकृतीस्वाथ्य ठिक नसतांनाही साधक आणि भक्तांच्या प्रेमासाठी महोत्सवासाठी उपस्थित असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत बाळाजी आठवले यांच्या दर्शनाने उपस्थित साधकहिंदुत्वनिष्ठ भावविभोर झालेमहोत्सवाच्या प्रारंभी शंखनादगणेशवंदना आणि वेदमंत्रपठाण झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
Attendence 1 Cm Pramod Sawant ; गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
या प्रसंगी गोवा येथील कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे पद्मश्री सद्गुरु बह्मेशानंद स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूदेवकीनंदन ठाकूरकेंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीश्रीपाद नाईकगोव्याचे वीजमंत्री श्रीसुदीन ढवळीकरगोवा राज्याचे समाज कल्याणमंत्री श्रीसुभाष फळदेसाईभाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्रीदामोदर नाईककर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार श्रीयदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, ‘सुदर्शन न्यूज’चे प्रधान संपादक श्रीसुरेश चव्हाणकेसनातन संस्थेचे प्रवक्ते श्रीचेतन राजहंस आणि श्रीअभय वर्तक उपस्थित होते.
सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहे, हा ऐतिहासिक क्षण ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री
Sripad Naik Cm Pramod Sawant ; गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, ‘‘सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहेहा ऐतिहासिक क्षण आहेछत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने गोवा भूमी पावन झाली आहेगोव्यात आक्रमकांनी लाखो हिंदूंच्या हत्या केल्यामात्र तरीही येथील हिंदूंनी सनातन हिंदु संस्कृती अखंड ठेवण्याचे कार्य केले आहेअशा पावन भूमीत सनातन राष्ट्रासाठी शंखनाद होणेहा शुभसंकेत आहेसनातन राष्ट्र निर्मितीच्या कार्यात गोव्यातील धर्मप्रेमी सनातन संस्थेसोबत आहेत.’’
गोवा ही ‘बीच’वर बसण्याची नव्हे, तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी ! – पू. देवकीनंदन ठाकूर
Pu.Devkinandan Thakur Cm Pramod Sawant ; गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
गोवा ही ‘बीच’वर (समुद्रकिनारीबसण्याची नाहीतर परशुरामाची उपासना करण्याची भूमी आहेपाकिस्तानचे सरकार जे स्वतभीक मागणारे आहेते आतंकवादी प्रशिक्षित करून इतरांची हानी करताततर दुसरीकडे भारतात मंदिरेगोशाळा आणि वेदविद्यालय यांचे निर्मिती होत आहेत्यानंतर आमचे राष्ट्र हिंदु राष्ट्र होते आणि पुढेही रहाणार आहे.

 

हिंदूंनो, राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवून शक्तीची उपासना करा ! –  पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी, गोवा
Sadguru Bhrahmeshanad Swamiji Cm Pramod Sawant ; गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवाआज गोव्याची समाजात जी मलिन प्रतिमा होती
ती दूर होऊन एक सात्त्विक परशुराम भूमी म्हणून गोव्याची ओळख सनातन संस्थेच्या कार्यामुळे निर्माण झाली आहेश्री हनुमानश्री रामश्री कृष्ण यांच्या हातात आयुधे आहेतही आयुधे धर्माच्या रक्षणासाठी आहेतआम्हाला शांती हवी आहेसनातन धर्म टिकल्यानंतरच जगात विश्वास अन् शांती निर्माण होईलआज हिंदू जागा न झाल्यासतर उद्याचा दिवस आपला रहाणार नाहीसर्व समाजाने सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहेआम्हीही या कार्यात सहभागी आहोतया कार्याला आमचेही आशीर्वाद आहेत.
राष्ट्राचे सनातनत्व टिकवून ठेवण्यासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’! – चेतन राजहंस
Dr Pramod Savant Cm Pramod Sawant ; गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या हिंदूंची त्यांचा धर्म विचारून हत्या केलीत्यामुळे भारतासमोर उभी असलेली आव्हाने पाहिलीतर ‘सनातन धर्मियांचे अस्तित्व आणि सनातन धर्माचे संरक्षण’ अत्यंत महत्त्वाचे आहेत्यामुळे सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहेहा महोत्सव धर्मभक्तांना आध्यात्मिक बळ देईलएक नवचैतन्य आणि ऊर्जा प्रदान करेल.

कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार श्रीयदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार म्हणाले, ‘‘अध्यात्म हाच आपला सर्वांचा मूळ गाभा आहे आणि तीच आपल्या सनातन राष्ट्राची मूळ संकल्पना आहेसनातन राष्ट्र ही राजकीय सत्ताव्यवस्था नसून आध्यात्मिक सेवाभावाने केलेली व्यवस्था आहे.’’ या प्रसंगी गोव्याचे वीजमंत्री श्रीसुदीन ढवळीकरभाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्रीदामोदर नाईक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केलेमहोत्सवाच्या प्रारंभी धर्मसंस्थापनेसाठी १ कोटी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजपास प्रारंभ करण्यात आला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!