under MPDA for one year : आणखी एका सराईत गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी केले “स्थानबध्द” -NNL

नांदेड| ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक यांनी आरोपीस दिनांक 21/12/2024 रोजी ताब्यात घेऊन वरिष्ठाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावरून आणखी एका सराईत गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड शहरात तसेच जिल्ह्यामध्ये शांतता व सूव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी तयार करुन, आरोपी विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेदांराकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. MPDA अंतर्गत चालू वर्षामध्ये 13 आरोपीतांना कारागृहामध्ये “स्थानबध्द” करण्यात आले आहे.

तसेच शहरात तसेच जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांची यादी तयार करुन, त्यांना स्थानबध्द करण्याची प्रकीया चालु करण्यात आली असून, त्या अंतर्गत पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांचेकडून सराईत गुन्हेगार नामे वैभव पिता राजु हुंडे वय 22 वर्ष व्यवसाय बेकार रा. दत्तमंदिर जवळ हडको, नांदेड ता. जि. नांदेड या आरोपी विरुध्द खुनाच्या प्रयत्नांसहित दरोडा, शासकिय कामात अडथळा करुन खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दरोडा, दंगा व गंभीर दुखापत अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे व दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याचे विरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमा प्रमाणे स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे सादर करण्यात आला होता.

अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन मा. श्री. अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हे धोकादायक व्यक्ती सिध्द झाल्याने आरोपी नामे वैभव पिता राजु हुंडे वय 22 वर्ष व्यवसाय बेकार रा. दत्तमंदिर जवळ हडको, नांदेड ता. जि. नांदेड यास एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे दिनांक 21/12/2024 रोजी आदेश पारीत केले आहेत. त्यास आज रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. यापुर्वी नांदेड जिल्हयातील 12 गुन्हेगाराना MPDA कायद्या अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या 13 झाली आहे.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भौकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, नांदेड़ श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड ओमकांत चिचोलीकर, पोलीस निरीक्षक, पो. स्टे. नांदेड ग्रामीण यांनी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button