किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या असलेल्या शिखर कैलास टेकडी महादेव मंदिर दयाल धानोरा येथे दि 5 डिसेंबर पासून 22 वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे त्यावेळी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले
किनवट तालुक्यातील शिवणी पासुन जवळच असलेल्या शिखर कैलास टेकडी महादेव मंदिर दयाल धानोरा येथे दि 5 डीसेंबर ते 9 डिसेंबर 2024 या कालावधीत 22 वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे या वेळी पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती शिखर कैलास टेकडी महादेव मंदिर दयाल धानोरा येथे दि 5 डीसेंबर रोजी सकाळी होम हवन करून मंदिराचे मुख्य विश्वस्त संत श्री श्री श्री लिंबाजी महाराज यांच्या हस्ते पुजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र , तेलंगणा, आंध्र प्रदेश,या राज्यातील हजारो भाविक भक्तांनी पहिल्याच दिवशी गर्दी मोठ्या प्रमाणात केली होती. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. 5 डीसेंबर ते 9 डिसेंबर 2024 या कालावधीत येणाऱ्या सर्व भक्तांना दररोज दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे