नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बळीरामपुर येथील सार्वजनिक रोडवर काल सायंकाळी तीन जणांनी पाॅवरलुम शेड बाजूला पुर्व वैमनस्य मधुन विशाल सरोदे यांच्या वर तलवार व चाकुने वार करून खून केला असुन घटना स्थळावर आरोपी पळुन गेले , घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सह वरीषठ अधिकारी यांनी भेट दिली असुन आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना करण्यात आली आहेत,या घटनेमुळे बळीरामपुर भागात खळबळ उडाली आहे.


ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बळीरामपुर येथील सार्वजनिक रोडवर पाॅवरलुम शेड बाजूला विशाल बाबु सरोदे वय 30 वर्ष रा.बळीरामपुर यांच्या वर आरोपी नितीन डोंगरे,प्रकाश क्षिरसागर, दोघांसह इतरांनी तलवार व चाकुने वार करून खून केला हा खुन पुर्व वैमनस्य मधुन झाला असुन मयत विशाल यांच्या व रआठ गुन्हे दाखल आहेत,तर फरार असलेले हे गुन्हेगार वृत्तीचे असुन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटना माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, डि.बी.पथक उपनिरीक्षक महेश कोरे, विश्वदिप रोडे यांच्या सह डि.बी.पथक पोलीस अंमलदार यांनी भेट देऊन गंभीर जखमी असलेल्या इसमास शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचारासाठी दाखल केले, यावेळी डॉक्टर यांनी मृत घोषित केले.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुरज गुरूव, पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक,यांच्या सह गुन्हे शौध पथक नांदेडचे ऊदय खंडेराव व वरीष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली व तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार केली असून वेगवेगळ्या भागात आरोपीचा शोध पोलीस पथकाद्वारे करण्यात येत आहे.

या प्रकरणी मयत चुलता अनिल ज्ञानोबा सरोदे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा कलम 103,1,352,3,5,बिएनस,सह कलम 4/25,4/27भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, पोलीस अंमलदार अमोल भोकरे हे अधिक करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.बळीरामपुर भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, 27 डिसेंबर रोजी दूपारी बळीरामपुर भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.