नांदेड l नांदेड वाघाळा शहर महापालिकेतील नऊ जणांना पदोन्नती देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी 26 डिसेबंर रोजी काढले असून याआदेशान्वये सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी उपायुक्त संजय जाधव व विधी अधिकारी स.अजितपालसिंघ संधू यांना आता उपायुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे तर डॉ.फरहतउल्ला बेग,गुलाम सादेख,रमेश चौरे यांनाही उपायुक्त समकक्ष पदावर पदोन्नती मिळाली आहे तर महापालिकेतील अन्य चौघांनाही पदोन्नती देण्यात आली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी शिपाई पदापासून सुरू केलेली पदोन्नतीची प्रक्रिया आता अधिकारी संवर्गापर्यंत पोहोचली आहे. कर्मचारी हिताचे निर्णय घेण्याचा चांगला पायंडा डॉ. सुनील लहाने यांनी पाडला होता. तोच पायंडा पुढे घेऊन जात विद्यमान आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनीही कर्मचारी हिताचे निर्णय सातत्याने घेतले आहेत. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रश्नांविषयी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीच आनंद निर्माण करणारी ठरली आहे. आयुक्त यांनी लिपिक संवर्गातून वरिष्ठ लिपिक पदी पदोन्नती दिली. त्याचवेळी वरिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना अधीक्षकपदी नेमणूक देण्यात आली आहे, त्यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळालेली ही पदोन्नती प्रक्रिया आता आज अधिकाऱ्यां पर्यंतही पोहोचली आहे.
निवृत्तीच्या उंबरठ्यावर 31डिसेबंर रोजी सेवानिवृत्त होत असलेले आणि वाघाळा नगरपालिकेतील कर्मचारी असलेले व पदोन्नतीचा लाभ मिळालेले एकमेव संजय जाधव यांना व विधी अधिकारी स.अजितपाल संधु यांना उपायुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी संवर्गातही समाधान व्यक्त केले जात आहे. सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त असलेले डॉ. मिर्झा फरहत उल्ला बेग यांना मुख्य उद्यान अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. रमेश चौरे हे आता क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नत झाले आहेत. त्याच वेळी गुलाम सादेख यांना मालमत्ता विनियोग अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
महापालिकेतीलआर.के.संगमवार आणि रणजीत जोंधळे यांना अनुरेखक पदी तर सहाय्यक ग्रंथालय अधिकारी म्हणून श्रीनिवास इज्जपवार तसेच स्वच्छता अधिकारी म्हणून बालाजी देसाई यांनाही पदोन्नती अधिकारी संवर्गातील नऊ जणांना पदोन्नती देण्याचे आदेश आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी दिले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे,अधिकाऱ्यां सह कर्मचाऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पदोन्नती मिळालेल्या सर्वांचे कर्मचारी मित्र मंडळ यांनी मनपा कार्यालयात संबंधित विभागात जाऊन अभिनंदन केले आहे.