नवीन नांदेड l लहुजी साळवे यांच्या 230 व्या जयंती निमित्ताने हडको परिसरातील लहुजी साळवे सांस्कृतिक सभागृह येथे 29 डिसेबंर रोजी वक्ते प्रल्हाद लुलेकर यांच्यी विविध राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रबोधन सभा, वदूपारी 3 वाजता बापुराव जमदाडे यांच्या प्रबोधन गायनाचा कार्यक्रम, सायंकाळी 7 वाजता सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्यी सत्यवाणी ,तर 30 डिसेबंर रोजी भव्य मिरवणूक मुख्य मार्गावरून व दुपारी तीन वाजता शाहीर गौतम पवार यांच्या शाहीरी जलसा,व सायकांळी 5 वाजता प्रबोधन सभा प्रमुख वक्ते अजिंक्य चांदणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लहुजी साळवे यांच्यी जयंती साजरी करण्यात येणार असुन सकाळी ध्वजारोहण, अनुसयाबाई दिगांबर घंटेवाड यांच्या हस्ते तर प्रबोधन सभा सायंकाळी 5 वाजता तर जयंती सोहळा उद्घाटन ना.हेमंतभाऊ पाटील महाराष्ट्र विधान परिषद शिवसेना गटनेते, कॅबिनेट मंत्री दर्जा,तर प्रमुख उपस्थिती म्हणून बाबा बलविंदर सिंग महाराज गुरुद्वारा लंगर प्रमुख नांवेड,आ. प्रतापराव पाटील चिखलीकर आ. आनंदराव पाटील बोंढारकर नांदेड दक्षिण विधानसभा सदस्यआ.अमित गोरखे विधान सभा सदस्य,विनय पाटील गिरडे जिल्हा प्रमुख शिवसेना दक्षिण शिंदे गट, डॉ.संतूकराव हंबर्डे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी. फारूक अहेमद राज्य प्रवक्ते वंचित बहुजन आघाड़ी नांदेड ,वैजनाथ देशमुख भाजपा उपाध्यक्ष भाजपा ,सभेचे अध्यक्ष चंद्रकांत मेकाले ,प्रमुख वक्ते प्रल्हाद लुलेकर साहित्यीक औरंगाबाद हे राहणार आहेत.
सिडको परिसरातील अण्णा साठे व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पुरस्कार प्राप्त मान्यवर गंगाधरराव वाघमारे,आर.जे. वाघमारे ,नामदेव पदमने,कैलास गायकवाड , यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे डि.एम. नेटके गुणवंत काळे,जीवन पाटील घोगरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड, नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख, जेष्ठ नागरिक शंकर धिरडीकर ,प्रमोद टेहरेमाजी नगरसेविका बेबिताई गुपिले ,विठ्ठल गायकवाड, वंचित बहुजन आघाडी महानगर अध्यक्ष, गणेश तादलापूरकर , राजश्री पाटील,युवा नेते राजूभाऊ लांडगे, तुलजेश यादव शहर प्रमुख शिवसेना उद्धव पाटील शिंदे तालुका प्रमुख शिवसेना शिंदे, सुहास पा. खराणे, नंदुशेठ अडकटलवार उद्योजक यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.दुपारी शाहिर बापूराव जमदाडे यांचा प्रबोधन गायन कार्यक्रम वेळ 3 वाजता होणार आहे.
30 डिसेंबर 24 सोमवार मिरवणुक सकाळी 10वा क्रांतिवीर लहुजी साळवे सभागृह हडको, मुख्यमार्गाने संभाजी चौक मार्गे क्रांतिवीर लहुजी साळवे सभागृह हडको येथे समारोप होईल तर प्रबोधन सभा सायं 5, वाजतासभेचे उद्घाटक खा.रविंद्र चव्हाण प्रमुख उपस्थिती, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी जिल्हा सदस्य आनंदराव गुंडले,दिलीप कंदकुर्ते जित्तुसिंग टाक ,साहेबराव मामिलवाड,संजय पा. घोगरे, माधवराव डोम्पले, मनोहर शिंदे, संकेत पाटील ,महेश शिंदे,सतीश बस्वदे निवृत्ती जिंकलवाड, ब्रिजलाल उगवे ,भारत खडसे,जयप्रकाश वाघमारे,सौ.ज्योति कदम.प्रा.मधुकर गायकवाड ,प्रकाश कांबळे विजय रणखांब,डि.एम.तपासकर , लालबाजी घाटे,एस.पी.कुंभारे,माजी नगरसेविका डॉ.सौ.करूणाताई जमदाडे,सौ.प्रा.ललिता शिंदे सामाजिक कार्यकर्त्या ,सौ. निकिता शहापूरवाड यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या प्रमुख वक्ते अजिंक्य चांदणे हे मार्गदर्शन करणार आहेत तर दुपारी तीन वाजता शाहीरी जलसा शाहीर गौतम पवार व संच यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या जयंती सोहळायाला उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती मंडळ अध्यक्ष श्रीरंग खानजोडे , सचिव ज्ञानोबा सुर्यवंशी, सहसचिव पप्पु गायकवाड, अंबादास मेकाले, राजेश गायकवाड,उपाध्यक्ष सूरेश कांबळे, केशव कांबळे, कोषाध्यक्ष पि.एस. सुर्यवंशी, समस्त जयंती मंडळ पदाधिकारी व समाज बांधव सिडको हडको वाघाळा नवीन नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.