नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी (Operatation flush out) अतंर्गत अवैध जनावरांची वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना दिले होते. त्यावरून हदगांव पोलीसांनी कत्तली करीता नेणाऱ्या 10 गायीची सुटका करून 6,27,000/- रू चा मुद्येमाल जप्त केला आहे.
त्या अनुषंगाने दिनांक 05.10.2024 रोजी पहाटे 04.00 वा. चे सुमारास हदगांव पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारां मार्फत माहीती मिळाली की बोलेरो पिकअप वाहना मध्ये 10 गायी दाटीवाटीने घेवुन जात असुन सदर वाहन हे उमरखेड टी पॉईंट येथे थांबलेले आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्या वरून रात्रगस्त अधीकारी सपोनि सुरेश मान्टे, पोकॉ जेठण पांचाळ, व चालक पोकॉ रावजी केंद्रे असे उमरखेड टीnपॉईंट येथे गेले असता उमरखेडकडे जानारे रोडचे बाजुस बांधकाम चालु असलेल्या पुलाचे सर्वीस रोडवर बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच-28/बीबी-2221 उभे होते.
त्या वाहनाची बारकाईने पाहाणी केली असता आतमध्ये 10 गायी दाटीवाटी क्रुरतेने प्राण्यास इजा होईल अशा प्रकारे बांधुन त्यांची चारा पाण्याची व्यवस्ता न करता वाहतुक करीत असल्याचे मिळुन आले. आजु बाजुला पाहाणी केली असता सदर वाहन चालक व इतर लोक वाहन व गायी सोडुन पळुन गेले आहेत. सदर वाहन व 10 गायी असे एकुण 6,27,000/- रू चा मुद्येमाल ताब्यात घेवुन गायीना गोशाळेत जमा करून पोकों जेठण पांचाळ यांचे फिर्यादी वरून पोस्टे हदगांव गुरन 281/2024 विवीध कलमान्वये अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती शफकत अमना, सहा पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधीकारी भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि राजेश पुरी, सपोनि सुरेश मांन्टे, पोकॉ जेठण पांचाळ, रावजी केंद्रे यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.