Kabaddi ; राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा ४ फेब्रुवारी पासून – NNL

नांदेड l औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची २८ वी आणि महिलांची २३ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा येत्या ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे ही स्पर्धा होणार असून पुरुष शहरी,पुरुष ग्रामीण आणि महिला (खुला) अशा तीन गटात सामने खेळवले जाणार आहेत.या स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी असून प्रवेशिका व नियमावली मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभाग व गट कार्यालयांत तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या विविध कंपन्या, कारखाने आदी आस्थापनांच्या पुरुष संघांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे, तर महिला संघांसाठी ही स्पर्धा खुली असेल. तिन्ही गटातील अंतिम विजेत्या संघाना प्रत्येकी रु.५०,०००/-, अंतिम उपविजेत्या संघांना प्रत्येकी रु.३५,०००/-, अंतिम उपांत्य उपविजेता संघाना प्रत्येकी रु.२०,०००/- बक्षिसे दिली जातील.

तसेच विजेत्या संघांना सांघिक चषक, खेळाडूंना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल. मुंबई व ठाणे वगळता बाहेरगावाहून येणाऱ्या संघांना निवास व भोजन व्यवस्थेसाठी प्रतिदिन रु.४,०००/- दिले जातील. महिलांच्या मुंबई व ठाणे येथील संघांना प्रतिदिन रु.१,०००/- प्रवास खर्चासाठी दिले जातील ,पुरुष संघासाठी रु.३००/- आणि महिला संघासाठी रु.२००/- प्रवेश शुल्क असेल.

प्रवेशिका प्रवेश शुल्कासह हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई येथे स्विकारल्या जातील,मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने व भारतीय कबड्डी संघटनेच्या नियमानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.जास्तीत जास्त संघांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button