Kabaddi ; राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा ४ फेब्रुवारी पासून – NNL
नांदेड l औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची २८ वी आणि महिलांची २३ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा येत्या ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे ही स्पर्धा होणार असून पुरुष शहरी,पुरुष ग्रामीण आणि महिला (खुला) अशा तीन गटात सामने खेळवले जाणार आहेत.या स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी असून प्रवेशिका व नियमावली मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभाग व गट कार्यालयांत तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या विविध कंपन्या, कारखाने आदी आस्थापनांच्या पुरुष संघांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे, तर महिला संघांसाठी ही स्पर्धा खुली असेल. तिन्ही गटा...
