हिमायतनगर तालुक्यातील खडकी बा. जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी अमित जवाहर नवोदय विदयालय प्रवेशासाठी पात्र -NNL

हिमायतनगर। तालुक्यातील मौजे खडकी बा. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अमित शुद्धोधन हनवते याने केंद्रीय जवाहर नवोदय विदयालय परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळविले आहे. आता तो नवोदय प्रवेशसाठी पात्र ठरला असून, त्याने खडकी बाजार गावाचे नाव लौकिक केले आहे.

तालुक्यातील दुर्गम भागातील खडकी या गावातील कोणताच विध्यार्थी जव्हार नवोदय विद्यालय परीक्षेत पात्र झाला नव्हता. परंतु खडकी गावचे शैक्षणिक, क्षेत्रात मोठ मोठ्या पदावर वेगवेगळे पद भूषवणारे अनेक व्यक्ती होऊन गेली. स्पर्धेच्या युगात जवाहर नवोदयाच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्याचे काम येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या अमित शुद्धोधन हनवते या विद्यार्थ्याने गावातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

अमित शुद्धोधन हनवते याचे वडील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष असून खडकी बाजार ग्रामपंचायत माझी उपसरपंच आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष आहेत. यांनी शेती समभाला जेमतेम परिस्थितीमध्ये आपल्या मुलाचे शिक्षण देत आहेत. अमित शुद्धोधन हनवते यांनी मिळविलेल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक भूतनर सर, पठाण सर, रायवार सर, अदीसह, जवाहर नवोदय परीक्षेचे मार्गदर्शक शिवाजी माने करंजीकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन मिळाले असल्याचे अमित हनवते यांनी सांगितले. त्याचबरोबर आई वडील, काका काकू, मामा आत्याबाई, यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button