A wave of thieves in broad daylight : हिमायतनगर शहरातील आठवडी बाजारात दिवसाढवळ्या चोरट्यांचा धुमाकूळ

हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी खरीप हंगाम आणि आठवडी बाजारात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी बैंकेसह दुकानात गर्दी केली असून, या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरीक हैराण झाले आहे. हिमायतनगर शहरात दिनांक २८ रोजी दिवसाढवळ्या गर्दीचा फायदा घेऊन रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी पावसाळा आणि खरीप हंगामाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

शहर व परिसरात गेल्या पाच ते सात दिवसापासून वादळी वारे व विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रान शिवारात पाणीच पाणी झाले असून, मृग नक्षत्र अवघ्या आठवड्यावर आला असल्याने शेतकऱ्याने बी – बियाणे खरेदीसाठी गर्दी केली आहे. दिनांक २८ रोजी आठवडी बाजार असल्याने हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी, नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. तालुक्यातील मौजे वारंगटाकळी येथील शेतकरी रामदास उत्तम हनवते यांनी भारतीय स्टेट बैंकेतून 50 हजार रुपये उचल केली. आणि बी बियाणे खरेदीसाठी येथील वैशाली कृषी सेवा केंद्रात बियाणांचे भाव विचारण्यासाठी गेले होते.

येथे अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत शेतकऱ्याच्या थैलीतील 50 हजारापैकी 40 हजार चोरून घेतले. हा प्रकार लक्षात येताच येथे उपस्थित अनेक शेतकऱ्यांनी चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडून त्याच्याकडून 20 हजाराची रक्कम तात्काळ वसूल करण्यात आली असली तरी चोरट्याने आपल्या अन्य साथीदाराच्या सहाय्याने वीस हजार लांबविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर अज्ञात चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत याबाबत तक्रार दिली असून, वृत्त लिहीपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

तर दुसरी एक घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील शेतकऱ्यासोबत शहरातील बुलढाणा अर्बन बँकेत घडली असून, शेतकरी साईनाथ राजन्ना कप्पलवाड दुपारी 1 वाजून 24 मिनिटांनी बँकेच्या रांगेत उभे असतांना त्याच्या थैलीला ब्लेड मारून अज्ञात चोरट्याने दहा हजाराची रक्कम लांबविली आहे. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून, या चोरीची तक्रार देखील सदर शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात दिली असून, पोलीस त्या दिशेने तपस करत आहेत. एव्हढेच नाहीतर शहरातील आठवणी बाजारात मोबाईल चोरटे, खिसे कापूनी धुमाकूळ माजविला असून, अनेकांचे खिसे कापून रक्कम लंपास झाली तर काही जणांचे मोबाईल चोरीला गेल्याचे आठवडी बाजारातील नागरिकांनी सांगितले आहे.

एकूणच सध्याच्या परिस्थितीत हिमायतनगर शहर परिसरात चोरटे सक्रिय झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. या प्रकाराला आवर घालण्यासाठी हिमायतनगर पोलिसांनी आठवडी बाजारात तसेच आगामी खरीप हंगाम लक्षात घेता कृषी दुकान व बँक परिसरात पोलिसांची गस्त लावावी आणि शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना चोरट्यापासून संरक्षण द्यावे अशी मागणी केली जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button