नवीन नांदेड़| धनेगाव येथील जय हनुमान सोसायटी सर्वे नं. 121 मध्ये प्लॉट क्र.368 वर अनाधिकृ मोबाईल टावरचे काम बंद करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा धनेगाव ग्रामस्थानी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.


दिलेल्या निवेदनात धनेगाव येथील गेली बऱ्याच दिवसा पासून कोणतीही परवानगी न घेता टॉवर चे काम सुरु असून या बाबत गावकरी यांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात उपोषणास बसत असल्याबाबत. गावकारी मौ. धनेगांव (ज.ह.सो.) ता.जि. ता. जि. नांदेड येथील रहिवाशी असून आमचे सर्वे नं. 121 मध्ये प्लॉट क्र.368 वर अनाधिकृत मोबाईल टावरचे काम एका खाजगी कंपनी मार्फत काम आज रोजी चालु आहे.


या अगोदर वरील संदर्भीय पत्राअनुषंगने आम्ही वारंवार तक्रारी तोंडी व लेखी सुध्दा सांगीतले. तरी पण आज रोजी ग्राम पंचायत कार्यालय धनेगांव / मुजामपेठ या कार्यालयाचे कसलीही कायदेशीर परवानगी न घेता, जबरदस्तीने अनाधिकृत मोबाईल टावरचे काम चालू केले आहे. आम्ही राहत असलेल्या गल्लीत हा मोबाईल टावरचे काम तात्काळ बंद करण्यात यावे आणि वस्तीमधील लोकांना दमदाटी करीत आहे. आम्ही वस्तीमधील राहणारे सर्व लोकांनी विरोध केला पण हे टॉवरचे काम पोलीस कर्मचारी आणुन आमच्यावर दबाव टाकून हे काम सुरुच ठेवल आहे.


तरी मा. साहेबांनी आमचे वारंवार टॉवर विरुध्द तक्रार दिलेले असून ही पोलीस प्रशासनचे मदतीने हे काम बालु आहे, वरील मोबाईलचे टावरचे काम बंद करण्यासाठी आम्ही समस्त गावकरी मंडळी दिनांक 04 जुलै 25 पर्यंत जर या खाजगी कंपनीचे टाॅवरचे चालु असलेले काम बंद न केल्यास उपोषणास बसत असल्याचे निवेदनात उल्लेख केला असून हे काम बंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.



