HomeनांदेडUnderground : वसरणी या गावी भुयारी मार्ग करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन, आंदोलन...

Underground : वसरणी या गावी भुयारी मार्ग करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन, आंदोलन स्थळी आ.बोढारकर यांच्यी चर्चा

नवीन नांदेड| राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील वसरणी ता.जि. नांदेड या गावासाठी भुयारी मार्ग करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत बेमुदत धरणे आंदोलनास नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी भेट देऊन लवकरच केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील वसरणी ता.जि. नांदेड हे गाव महामार्गाच्या दक्षिण-उत्तर दोन्ही बाजुला आहे. या गावाची लोकसंख्या दक्षिण भागाला 5 ते 6 हजार तर उत्तरेला मुळ गावात 8 ते 10 हजार लोकसंख्या असून या महामार्गामुळे दोन्ही बाजुनी होणारी दररोजची दळण-वळण, कामाला जाणारे कामगार मुळ गावात जि.प.शाळा असल्यामुळे तिथे जाणारे शाळकरी विद्यार्थी दक्षिण भागात असलेल्या शेतीमुळे गावातून जाणारे गुरे-ढोरे या सर्वांना दक्षिणेकडून उत्तरेकडे ये-जा करण्यासाठी महामार्ग ओलांडून जावा लागणार आहे. या मार्गावर मोठ्या गाड्यांची वेग क्षमता जास्त असल्यामुळे या ठिकाणी जिवीत हानी घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच अंत्यविधीचे ठिकाण राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तर बाजूस आहे.

त्याचबरोबर गावातील तिर्थस्थळे (मंदिर, विहार, मज्जीद) हे मुळ गावात असल्यामुळे दररोज ये-जा करण्यासाठी हा महामार्ग धोकादायक ठरु शकतो. भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या I.R.C SP: 84-2014 या मार्गदर्शक तत्वामधील 2.13.3 मध्ये असे अधोरेखित करते की, हलके वाहनासाठी अंडरपास दिला जाऊ शकतो. तसेच 2.13.4 मध्ये गुरे-ढोरे / पादचाऱ्यांसाठी अंडरपास आणि पादचाऱ्यांसाठी पोल सुध्दा प्रदान केला जाऊ शकतो. तसेच शाळा, रुग्णालय, कारखाना या पासुन 200 मिटर अंतरावर पादचाऱ्यांसाठी अंडरपास ब्रिज देखील उपलब्ध केला पाहिजे अशी तरतुद आहे.

या राष्ट्रीय महामार्गावर वसरणी येथे भुयारी मार्ग देण्यात यावा,या मागणीसाठी आपण आपल्या स्तरावरुन योग्यतो पाठपुरावा करुन ही मागणी मान्य करण्यासाठी सहकार्य करावे. या मागणी संदर्भाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रस्ते वाहतुक महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन सुध्दा कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वसरणी बसस्टँड येथे दिनांक 2 जुलै 25 रोजी पासून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिध्दोदन भिमराव कापसीकर,यांच्या सह ऊतम काळे, भालचंद्र मोळके,सुधाकर भिसे, आकाश गजभारे, माधव जटाळे,चेतन गजभारे, टोबु पवळे , दिनेश सिंगाडे, महेंद्र सोनकांबळे, नागरीक व महिला बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. या ठिकाणी आ.बोढारकर यांनी संबंधितांशी चर्चा केली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, शहरप्रमुख तुलजेश यादव,सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments